स्वच्छतेची चळवळ बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:09 PM2017-09-20T23:09:23+5:302017-09-20T23:09:35+5:30

नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी व आरोग्यदायी जीवन जगता यावे, यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात स्वच्छता ही सेवा.....

Strengthen the clean movement | स्वच्छतेची चळवळ बळकट करा

स्वच्छतेची चळवळ बळकट करा

googlenewsNext
ठळक मुद्देमनोजकुमार सूर्यवंशी : स्वच्छता ही सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी, गावागावात होणार जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी व आरोग्यदायी जीवन जगता यावे, यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात स्वच्छता ही सेवा अभियानास १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबर या दरम्यान जिल्हाभर राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी स्वच्छतेची चळवळ बळकट करुन स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी केले.
स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात चित्ररथाद्वारे जनजागृती केली जाणार आहे. या चित्ररथाला मुख्य कार्यपालन अधिकारी सुर्यवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजुषा ठवकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता) चंद्रशेखर पुद्दटवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अशोक मातकर, समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मोहन चोले, कार्यकारी अभियंता ए. पी मुखरे, एम.बी.मैद्दमवार, आरोग्य विभागाचे भगवान मस्के, गट विकास अधिकारी डी. एम. देवरे, एस.एम. तडस, के. एल. मोरे, कृषी विकास अधिकारी पाटील, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. एन.एच. फुके, मिडीया सोल्युशनचे उमेश महतो व कार्यक्रम व्यवस्थापक डी.एच. बिसेन यावेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथ व एलईडी व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. गावागावात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी हा चित्ररथ फिरणार आहे. शौचालय व स्वच्छतेचे महत्व सांगणारे लघुपट चित्ररथावर गावकºयांना दाखविल्या जाणार आहे.
१५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाºया स्वच्छता ही सेवा अभियान दरम्यान जिल्ह्यात स्वच्छतेची जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.
नादुरुस्त शौचालय व शौचालय असलेल्या कुटुंबाना गृहभेटी करुन स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणे, सक्रीय लोकसहभाग मिळविण्यासाठी महिला बचत गटांच्या सभा, शालेयस्तरावर मार्गदर्शन सभा, किशोरवयीन मुलींना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन व ज्येष्ठ नागरिकांची सभा घेवून मार्गदर्शन केल्या जाणार आहे. लोकसहभागातून श्रमदान करुन गाव परिसर स्वच्छता, महापुरुषांचे पुतळे, स्मारके स्वच्छ करणे, परिसर स्वच्छता करण्यात येत असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. लोकसहभागाशिवाय स्वच्छता ही चळवळ होणार नाही, असे सांगून सुर्यवंशी म्हणाले की, स्वच्छतेची सवय स्वत:हून लावून घ्यावी, असे प्रतिपादन सुर्यवंशी यांनी यावेळी केले.

Web Title: Strengthen the clean movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.