रक्त व प्लाझ्मा दानातून जीवनसाखळी मजबूत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:57 AM2021-05-05T04:57:38+5:302021-05-05T04:57:38+5:30
आता कोरोना काळात समाजासाठी काहीतरी करण्याची वेळ चालून आली आहे. रक्तदान, प्लाझ्मा दानाच्या माध्यमातून या संधीचे सोने करून निरोगी ...
आता कोरोना काळात समाजासाठी काहीतरी करण्याची वेळ चालून आली आहे. रक्तदान, प्लाझ्मा दानाच्या माध्यमातून या संधीचे सोने करून निरोगी नागरिकांनी जीवनसाखळी अधिक मजबूत करावी, असे आवाहन उडानच्या संस्थापिका कल्याणी भुरे यांनी नागरिकांना केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रभावी ठरला असून, छोट्या मुलांसह सर्वानाच यात ओढले आहे. परंतु गत वर्षांच्या तुलनेत यावर्षी कोरोना काळात रक्तदान शिबिर, प्लाझ्मा दान शिबिर होत नसल्याचे दिसत आहे. यासाठी उडान एक कदम आगे, जेसीआई व नवप्रतिभा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्व. डाॅ. यादोवराव भुरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ येथील गभने सभागृहात रक्तदान शिबिर व अँटिबॉडी टेस्टिंग (प्लाझ्मा डोनेशनसाठी) आवश्यक चाचणी शिबिर डॉ. हेडगेवार रक्तपेढी, नागपूरच्या सहकार्याने घेण्यात आले. सदर शिबिरात १० रक्तदात्यांनी रक्तदान आणि २२ व्यक्तिंनी अँटिबॉडी टेस्टिंग केली आहे. शिबिरासाठी अनिल गभने, तोषल बुरडे, प्रणय देशभ्रतार, पंकज गौपाले, नितीन बारई, श्रेयश बुरडे, नीतेश पटले, मयुर नखाते, विवेक बोरकर, प्रवीण आस्वले, गुलशन मेश्राम, चेतन हट्टेवार यांनी प्रयत्न केले.