संविधान जाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 09:57 PM2018-08-11T21:57:45+5:302018-08-11T21:58:09+5:30

दिल्लीतील जंतरमंतरवर काही समाजकंकटांनी भारतीय संविधान जाळले. संविधान मुर्दाबाद, आरक्षण मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. बाबासाहेब यांच्याविषयी अनादर व्यक्त केले. सदर कृत्य हे बेकायदेशिर असल्याची माहिती असूनही या कृत्याचे व्हीडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

Strict action against the Constitution burners! | संविधान जाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा!

संविधान जाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा!

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्ह्यातील विविध संघटनांसह संविधानप्रेमींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिल्लीतील जंतरमंतरवर काही समाजकंकटांनी भारतीय संविधान जाळले. संविधान मुर्दाबाद, आरक्षण मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. बाबासाहेब यांच्याविषयी अनादर व्यक्त केले. सदर कृत्य हे बेकायदेशिर असल्याची माहिती असूनही या कृत्याचे व्हीडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. अशा माथेफिरुंविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्ह्यातील विविध संघटना व संविधान प्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
भंडारा : भंडारा येथील संविधान प्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी मंगेश श्यामकुवर, आरपीआय (आ) चे जिल्हाध्यक्ष असित बागडे, सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड, सुशिल नगराळे, दिनेश गोस्वामी, आनंदराव मेश्राम, विनीतकुमार देशपांडे, अप्रोज खान, आतिश बागडे, शैलेश मेश्राम, अजय मेश्राम, गुलशन गजभिये, प्रशांत सूर्यवंशी, श्रद्धा डोंगरे, भावना रंगारी, सविता इलमकर, डॉ.ज्योती गणवीर, मंजुषा चव्हाण, स्नेहल मेश्राम, प्रशांत गजभिये, अश्विन गोस्वामी, धनंजय बर्वे, दर्शन बागडे, सुरज भालाधरे, योगीराज भालाधरे, सुहास गजभिये, एस.एस. बोरकर, हिवराज उके, इंजि. रुपचंद रामटेके यांच्यासह अनेक संविधानप्रेमी उपस्थित होते.
लाखनी : लाखनी येथे दिनेश वासनिक यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सोपविण्यात आले. यावेळी उमेश गोस्वामी, अनिल चचाने, अतुल वाघाये, रवी चेटुले, कमलेश नेवारे, दीपक झलके, विरेंद्र सोनवाने, कमलेश मेश्राम, बंटी वैद्य आदी उपस्थित होते.
भंडारा : युथ पँथर युवा सामाजिक संघटनेच्या वतीने ठाणेदार मधुकर चव्हाण यांना दिलेल्या निवेदनाप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष तेजपाल मोरे, महासचिव उमेश हरदास, उपाध्यक्ष मोरेश्वर राऊत, भंडारा जिल्हाध्यक्ष राहुल बांते, भंडारा शहराध्यक्ष दिनेश मेश्राम, सत्यपाल मोरे, रजत खोब्रागडे, राष्ट्रपाल मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Strict action against the Constitution burners!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.