ग्रामीणमध्ये कडकडीत तर शहरांत समिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 05:00 AM2020-12-09T05:00:00+5:302020-12-09T05:00:35+5:30

तुमसर शहरासह ग्रामीण भागात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानुसार दुकाने बंद करण्यात आली. मात्र दुपारनंतर दुकाने पुर्ववत सुरु झाली. माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

Strict response in rural areas but mixed response in cities | ग्रामीणमध्ये कडकडीत तर शहरांत समिश्र प्रतिसाद

ग्रामीणमध्ये कडकडीत तर शहरांत समिश्र प्रतिसाद

Next
ठळक मुद्देभारत बंद : पवनी येथे दीड तास रास्ता राेकाे, प्रशासनाला निवेदन, जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार नाही

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विराेध करण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे चित्र हाेते. शहरांत व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद हाेती. मात्र सर्व व्यवहार सुरळीत सुरु हाेते. पवनी येथे तब्बल दीड तास रस्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले. आंदाेलनादरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.  अपवाद वगळता एसटी बससह सर्व वाहतूक सुरळीत हाेती. आंदाेलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन देवून कृषी कायदा रद्द करण्याची मागणी केली. 
भंडारा शहरात सकाळी १० वाजता काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने माेटारसायकल रॅली काढण्यात आली. शास्त्री चाैकातून सुरु झालेल्या या रॅलीत अनेकजण सहभागी झाले हाेते. शहरातील व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्या पाठाेपाठ प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीनेही माेटारसायकल रॅली काढण्यात आली. आंदाेलनकर्त्यांनी शहरातील किसान चाैकातील शेतकरी पुतळ्याला मार्ल्यापण केले. तसेच शास्त्री चाैकातील शिवाजी महाराज, त्रिमुर्ती चाैकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यानंतर विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने त्रिमुर्ती चाैकात एकत्र येवून कृषी कायद्याच्या विराेधात घाेषणा देण्यात आल्या. काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, रिपब्लीकन सेना, सम्राट अशाेक सेना, दलीत पॅंन्थर, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, जनकल्याण अन्याय निवारण समिती, दलीत पॅन्थर महिला आघाडी यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. मेन लाईनसह शहरातील बहुतांश दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली हाेती. 
पवनी येथे काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माेहन पंचभाई यांच्या नेतृत्वात निलज, कारधा राष्ट्रीय महामार्गावर दीड तास रास्ता राेकाे करण्यात आला. यावेळी काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आदींचे पदाधिकारी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. पाेलीस निरीक्षक जगदीश गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून नंतर सुटका केली.
तुमसर शहरासह ग्रामीण भागात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. काॅंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानुसार दुकाने बंद करण्यात आली. मात्र दुपारनंतर दुकाने पुर्ववत सुरु झाली. माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
माेहाडी तालुक्यातील साताेना येथे काॅंग्रेस तालुकाध्यक्ष राजेश हटवार यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. तर हरदाेली येथे सरपंच सदाशिव ढेंगे यांच्या नेतृत्वात बैलगाडीवरुन माेर्चा काढण्यात आला. टायर पेटवून काही काळ वाहतूक राेखून धरण्यात आली. या आंदाेलनात गावकरी माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. ठाणा येथे माजी सरपंच शिवदास उरकुडे, दिनदयाल देशभतार यांच्या नेतृत्वात भारत बंद पाळण्यात आला. लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे जिल्हा परिषद सदस्य बिंदू काेचे, साेसायटीचे अध्यक्ष विजय कापसे, जितेंद्र बाेंदरे यांच्या नेतृत्वात आंदाेलन करण्यात आले. अत्यंत शांततामय वातावरणात आंदाेलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज व गाडगे महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ सभा घेवून भारतबंदचे समर्थन केले. पवनी तालुक्यातील अड्याळ येथे माेटारसायकल रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले. या रॅलीत वंचित बहूजन आघाडी, काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यासह शेतकरी सहभागी झाले हाेते. 
तुमसर तालुक्यातील नाकाडाेंगरी आणि गाेबरवाहीयेथे बंदचे आयाेजन करण्यात आले हाेते. 

एसटी बससह वाहतूक सुरळीत
 भारत बंद दरम्यान जिल्ह्यात एसटी बससह वाहतूक सर्व वाहतूक सुरळीत सुरु हाेती. एसटी बसच्या तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या. इतर सर्व फेऱ्या सुरळीत सुरु हाेत्या. पवनी येथे रस्ता राेकाेमुळे दीड तास वाहतूक खाेळंबली हाेती. मात्र त्यानंतर जिल्ह्यात कुठेही वाहतूक खाेळबंली नाही. बंद दरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र बंदमुळे एसटीबसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला. 
त्रिमुर्ती चाैकात चक्काजाम
 भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमाेरीत त्रिमुर्ती चाैकात जयजवान जय किसान संघटनेच्यावतीने रस्ता राेकाे करण्यात आला. अर्धा तास हा रस्ता राेकाे सुरु हाेता. त्यानंतर पाेलिसांनी बारा जणांना ताब्यात घेतले. या आंदाेलनाचे नेतृत्व जयजवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष सचिन घनमारे, माेहाडी तालुकाध्यक्ष सुगद शेंडे, रंजीत तिरपुडे, शिवदास वाहाने, नितेश खेत्रे यांनी केले.

लाखनी तहसीलवर माेर्चा
 लाखनी तहसीलवर माेर्चा काढून तहसील कार्यालय परिसरात धरण देण्यात आले. मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यात सार्वभाैम युवा मंच, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना, शिवसेना, प्रहार जनशक्ती, वंचित बहूजन आघाडी, बसपा, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी, अमरकला निकेतन, आदिवासी पिपल फेडरेशन, आदी संघटना सहभागी झाले हाेते.

 

Web Title: Strict response in rural areas but mixed response in cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.