प्रशासनाचा वज्र्राघात ; सुधारित आणेवारी ६२ पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:55 PM2017-11-01T23:55:05+5:302017-11-01T23:55:33+5:30
कर्जमाफीत शेतकºयांची प्रचंड बोळवण झाली असताना खरीप पिकाच्या सुधारित आणेवारीतून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा बळीराजावर वज्राघात केला आहे.
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवक
भंडारा : कर्जमाफीत शेतकºयांची प्रचंड बोळवण झाली असताना खरीप पिकाच्या सुधारित आणेवारीतून जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा बळीराजावर वज्राघात केला आहे. जिल्ह्यातील खरीप पिकाची सुधारीत आणेवारी ^६२ पैसे घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी नसल्याची बाब उघड झाली आहे.
धानाचे कोठार समजल्या जाणाºया भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि कमी पर्जन्यमान असल्यावरही भंडारा जिल्हा प्रशासनाने एक महिन्यापूर्वी खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केलेली होती.
खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून दृष्काळसदृश परिस्थिती असताना नजरअंदाज पैसेवारीच्या हंगामी आकडेवारीनंतर जिल्ह्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी असलेले पडीत क्षेत्र, कमी पर्जन्यमान, परतीच्या पावसात वादळी वाºयाने केलेले नुकसान याचा अंदाज घेवून सुधारीत आणेवारीत फायदा होईल, अशी शेतकºयांची आस होती. परंतू जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा जावईशोध लावीत शेतकºयांच्या वेदनेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या नजरअंदाज हंगामी पैसेवारीत पिक स्थिती उत्तम दाखविण्यात आली होती. दुसरीकडे दृष्काळसदृश्य परीस्थिती असताना आता पिक परीस्थिती उत्तम कशी झाली, असा सवाल शेतकरी विचारू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने एकूण ८८४ गावांपैकी ८४३ गावांची सुधारीत पैसेवारी ६२ पैसे दर्शविली आहे. यात ५० पैसांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या एकही गावांचा समावेश नाही. शेतातील बांध्यांमध्ये पाणीच पडले नाही तर धान्य कसे उगवणार? क्षेत्राची आणेवारी जास्त कशी? असेही शेतकरी बोलून दाखवित आहेत.
३३ टक्के पाऊस बरसला कमी
मान्सून काळात जिल्ह्यात सरासरी १३३०.२ मि.मी इतका सरासरी पाऊस बसरतो. यावषी १ जून ते ३१ आॅक्टोबर ार्यंत सरासरी पावसापेक्षा ३३ टक्के पाऊस कमी बरसला. विशेष म्हणजे मागील वर्षी म्हणजेच सन २०१६-१७ या वर्षात पावसाची टक्केवारी ७६ इतकी होती. यावेळी मात्र मागील वर्षीच्या तुननेत ९ टक्के पाऊस कमी म्हणजे ६७ टक्केच बरसला. आधीच कमी पर्जन्यमान , धानावर रोगाचे आक्रमण, सिंचनाच्या अपुºया सुविधा यामुळे बळीराजा त्रस्त असताना सुधारीत आणेवारीतही प्रशासनाने ठेंगा दाखविला काय? असे म्हणने वावगे ठरणार नाही.
अशी आहे तालुकानिहाय पैसेवारी
५० पैसांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४३ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६६ गावांची पैसेवारी ६१ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची सुधारीत पैसेवारी ५९ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ६३ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ६७ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ५७ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ६५ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ६० पैसे दाखविण्यात आली आहे. रब्बीच्या १४ गावांची पैसेवारी स्वतंत्रपणे जाहिर करण्यात येणार आहे.