पाचव्या दिवशीही कामगारांचा संप सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:35 AM2021-03-18T04:35:37+5:302021-03-18T04:35:37+5:30
वरठी : सनफ्लॅग व्यवस्थापनाच्या मोघलाई धोरणामुळे कामगारांना रस्त्यावर यावे लागले आहे. सनफ्लॅग कामगारांच्या मागण्या ३० वर्षे जुन्या आहे. सनफ्लॅगचा ...
वरठी : सनफ्लॅग व्यवस्थापनाच्या मोघलाई धोरणामुळे कामगारांना रस्त्यावर यावे लागले आहे. सनफ्लॅग कामगारांच्या मागण्या ३० वर्षे जुन्या आहे. सनफ्लॅगचा पोशिंदा तापत्या उन्हात भाजत असून, सनफ्लॅग व्यवस्थापन अधिकारी पोलीस सुरक्षेत मजा मारीत आहेत. पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने कामगारांना वाऱ्यावर सोडले. पोलिसांची सुरक्षा असल्याने व्यवस्थापन मग्रूर झाली आहे. प्रशासनाने मनात आणले, तर एका झटक्यात संपाचा तिढा सुटू शकतो.
यापूर्वी एका पोलीस अधीक्षकाने सनफ्लॅग व्यवस्थापनाला असाच धडा शिकविला होता. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने व्यवस्थापनाचे अतिरेक वाढला, असा आरोप होत आहे.
संपाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था बिघडले, असे काहीच घडले नाही. कामगार संघटना लोकशाही मार्गाने लढा चालविण्याच्या मनस्थितीत आहेत. काहीही झाले, तरी कायदा हातात घेणार नाही, असे धोरण त्यांनी स्वीकारले आहे. अधिकार शून्य अधिकारी बैठकीला येऊन चिथावल्यासारख्या बाता झाडत आहे. सर्व काही शांततेते सुरू असताना, पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाला सनफ्लॅग व्यवस्थापनाचा पुडका कशासाठी आहे, हे समजण्यापलीकडे आहे. सनफ्लॅग व्यवस्थापनाची स्वतःची सुरक्षा व्यवस्था आहे. कंपनीने खासगी सुरक्षा यंत्रणेला कंत्राट दिले आहे. कंपनी परिसरात शेकडो खासगी सुरक्षा गार्ड तैनात आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने दोन अधिकाऱ्यांसह ३८ पोलीस पुरविले. त्यांची स्वतःची सुरक्षा व्यवस्था असताना दिवस रात्र कंपनीच्या प्रवेश द्वारावर सरकारी सुरक्षा यंत्रणाचे काय काम हे समाजण्यापलीकडे आहे. यंत्रणा छुप्या रस्त्याने कामगार आत घुसविण्यासाठी कामी पडत असल्याची चर्चा सुरू आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी यांना बैठकीला बोलावून प्रतीक्षा दालनात बसविले. मागण्यांबाबत न बोलता अरेरावी केली. कामगारांना राग अनावर होईल, अशी भाषा वापरली, पण कामगार अजूनही लोकशाही मार्गाने लढा देत आहेत.
मागण्या ३० वर्षे जुन्या
कामगार संघटनांनी पुढे केलेल्या सर्व मागण्या जुन्याच आहेत. तीस वर्षांपासून सुरु असलेला त्रैवार्षिक करार, दिवाळीचा बोनस यासह कंत्राटी कामगारांना किमान वेतन व भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ आणि अनुभवानुसार स्थायी कामगार बनविणे. यात एकही मागणी नवीन नाही. सनफ्लॅग व्यवस्थापन व कंपनी नुकसानीत नाही.
बॉक्स
कोविडच्या प्रभावतातही सनफ्लॅग कंपनीने मोठा कमावला, हे मात्र विशेष आहे.
कामगारांवर कारवाईचा बडगा
सनफ्लॅग व्यवस्थापन माघार घेण्यास तयार नाही. आज नागपूरचे त्यांचे सर्वेसेवा कंपनीत दाखल झालेत. संप दडपण्याचा हालचाली वाढल्या आहेत. काही कामगारांना कामावरून कमी केल्याचे नोटीस गेटच्या बाहेर लावण्यात आल्याची धुसफूस कामगारांत सुरू आहे. कोणत्याही स्थितीत आंदोलनात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण कामगार संघटना मागण्या पूर्ण होईपर्यंत हटणार नाही, असे धोरण स्वीकारले आहे.