विहिरीत बसून आंदोलन करण्याचा प्रहारचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:33 AM2021-08-29T04:33:47+5:302021-08-29T04:33:47+5:30
तिरोडा तालुक्यातील मांडवी येथील लाभार्थी शेतकरी यांच्या शेतात धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. तसेच सालेकसा तालुक्यातील भजेपार ...
तिरोडा तालुक्यातील मांडवी येथील लाभार्थी शेतकरी यांच्या शेतात धडक सिंचन योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. तसेच सालेकसा तालुक्यातील भजेपार येथील लाभार्थी पुरुषोत्तम वाहेकार व भाडीपार येथील अनंतराम गेडाम यांच्या शेतात योजनेंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. मात्र पाच ते सहा वर्षांचा कालावधी लोटूनही त्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आली नाही. ज्या विहिरींचे बांधकाम पूर्ण झाले आहे त्या विहिरींपर्यंत वीज जोडण्यात आली नाही. योजनेची रक्कम व वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी अनेकदा संबंधित विभागाकडे करण्यात आली. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. ३० ऑगस्टपूर्वी या मागण्या मार्गी न लावल्यास प्रहारचे कार्यकर्ते शेतातील विहिरीत बसून ३० ऑगस्ट रोजी आंदोलन करतील असा इशारा महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे.