कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीने घेतला शेतकरी विकासाचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:40 AM2021-08-21T04:40:16+5:302021-08-21T04:40:16+5:30
यामुळे आरतीची ओळख पंचक्रोशीत होऊ लागली आहे. आरतीच्या या कार्यात पाथरी येथील प्रगतिशील शेतकरी अनुप बोरकर, सरपंच कैलास परतेती, ...
यामुळे आरतीची ओळख पंचक्रोशीत होऊ लागली आहे. आरतीच्या या कार्यात पाथरी येथील प्रगतिशील शेतकरी अनुप बोरकर, सरपंच कैलास परतेती, माणिकलाल नांदगाये, गावातील शेतकरी, शिक्षक सहभाग घेत आहेत. आरतीच्या घरी आई व वडीलही शेतीच करतात. विज्ञान युगात शेतीकडे तरुणांनी पाठ फिरवली आहे. नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या शेतीत परिश्रम करून गावाच्या विकासाकरिता प्रयत्न करावेत, असा ध्यास आरतीने घेतला आहे. विशेषतः मुलींनी या क्षेत्रात यावे, असे आवाहन आरतीने केले. स्वतः आत्मनिर्भर व्हावे तसेच गावही आत्मनिर्भर व्हाव, शेतकऱ्यांना तांत्रिक पद्धतीने मार्गदर्शन लाभावे, याकरिता आरतीने कृषी क्षेत्रात शिक्षण घेण्याचे निश्चित केले. त्या दिशेने आरतीचे प्रयत्न सुरू आहेत. आरतीला प्राचार्य डॉ. ठाकरे, उपप्राचार्य कडू, प्रा. धोत्रे यांचे मार्गदर्शन लाभले.