तुमसर-चिखला बस सेवेकरिता विद्यार्थ्यांच्या एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:35 AM2021-03-10T04:35:52+5:302021-03-10T04:35:52+5:30

यासंदर्भात तुमसर येथील परिवहन निरीक्षक यांना शिक्षण संघर्ष समिती तर्फे निवेदन देण्यात आले. १५ मार्च पर्यंत बस सेवा पूर्ववत ...

Student Elgar for Tumsar-Chikhala bus service | तुमसर-चिखला बस सेवेकरिता विद्यार्थ्यांच्या एल्गार

तुमसर-चिखला बस सेवेकरिता विद्यार्थ्यांच्या एल्गार

googlenewsNext

यासंदर्भात तुमसर येथील परिवहन निरीक्षक यांना शिक्षण संघर्ष समिती तर्फे निवेदन देण्यात आले. १५ मार्च पर्यंत बस सेवा पूर्ववत न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

चिखला परिसरात बस सेवा बंद आहे तुमसर बस करिता विद्यार्थी व नागरिकांना तीन किलोमीटर पायदळ राज्य महामार्ग पर्यंत जावे लागते. त्यामुळे शाळेत विद्यार्थी उशिरा जातात त्यामुळे त्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होतो या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त आहे. यासंदर्भात शिक्षण व संघर्ष समितीतर्फे विद्यार्थ्यांनी परिवहन निरीक्षक रचना मस्करे यांना निवेदन दिले.

डीटीओ भंडारा यांनी परवानगी दिल्यास बस सुरू करण्याची हमी दिली. १५ मार्चपासून बस सेवा पूर्व सुरू न केल्यास तुमचा राग आला समोर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षण संघर्ष समितीचे जय डोंगरे यांनी दिला. तुमसर चिखला, हिरापूर, हमेशा, कवलेवाडा, घानोड, सीतासावंगी, सक्करदरा येथे बस सेवा सुरू करण्यासंदर्भात आगार व्यवस्थापकांना परिसरातील ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर करून बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. हा संपूर्ण परिसर आदिवासीबहुल असून उच्चशिक्षणाची सोय या परिसरात नाही. त्यामुळे सकाळी सात व सायंकाळी पाच वाजता तुमसर वरून बस सोडण्याची मागणी करण्यात आली. तुमसर सक्कर्दरा सकाळी ८.३०

व संध्याकाळी ६.३०मिनिटांनी सक्करदरा तुमसर अशी बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तुमसर चिखला यापूर्वी बस सुरू होती मागील अनेक महिन्यांपासून सदर बस सेवा बंद आहे किमान दिवसातून या मार्गावर तीन वेळा बस सेवा सुरू करावी अशी मागणी माजी जि. प. सदस्य संगीता सोनवणे माजी सरपंच दिलीप सोनवणे गोबरवाही चे सरपंच साईनाथ उके उपसरपंच पंकज पंधरे यांनी केली आहे

Web Title: Student Elgar for Tumsar-Chikhala bus service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.