स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायक
By Admin | Published: November 1, 2016 12:38 AM2016-11-01T00:38:29+5:302016-11-01T00:38:29+5:30
सिहोरा परिसराीतल गावागावात स्पर्धा परीक्षांचे अभ्यास केंद्र उघडण्यात आले आहे.
नाना पटोले : सिहोऱ्यात अभ्यास केंद्र इमारतीचे उद्घाटन
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसराीतल गावागावात स्पर्धा परीक्षांचे अभ्यास केंद्र उघडण्यात आले आहे. या नि:शुल्क अभ्यास केंद्राची आचार संहिता असून केंद्र आणि राज्य शासनाच्या शासकीय विभागात विद्यार्थी सेवेत रूजू झाली आहे. निश्चितच हे अभ्यास केंद्र अन्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायक असल्याचे प्रतिपादन खा.नाना पटोले यांनी व्यक्त केले.
सिहोरा येथे ७ लाख खर्चून राजश्री शाहू महाराज अभ्यास केंद्राच्या नवनिर्मित इमारत बांधकामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती कविता बनकर होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून कृउबासचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती डॉ.अशोकपटले, माजी सभापती कलाम शेख, गटनेते हिरालाल नागपुरे, संचालक राजेश पटले, बंटी बानेवार, सुनिल लांजेवार, सरपंच नेहा कुंभारे, मनोज वासनिक, नंदकिशोर तुरकर, सलाम शेख, तंमस अध्यक्ष ताराचंद मेश्राम, सविता गोटेफोडे, मार्गदर्शक मंगेश शहारे, युगांतर युवा आणि सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे प्रकाश हेडावू उपस्थित होते. महालगावात फुले शाहू आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचा विद्यार्थ्यांनी रोपटे लावले असता, त्यांचे आज घडीला विशाल वटवृक्ष तयार झाले आहे. या अभ्यास केंद्रातून शासकीय सेवेत रूजू होणाऱ्या विद्यार्थी संख्या शंभरी ओलांडली आहे. याचे अभ्यास केंद्राच्या प्रेरणेने गावागावात अभ्यास केंद्र निर्माण झाले असून चालक आणि मालक विद्यार्थी आहेत. गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना नि:शुल्क व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सिहोऱ्याच्या अभ्यास केंद्रातून अनेक विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. आता या अभ्यास केंद्रात आयएएस, आय.पी.एस. तथा अन्य विद्यार्थी घडविण्यावर भर दिल्या जात असल्याने पुस्तक व अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी खासदार निधी अंतर्गत १५ लाख रुपये देण्याची घोषणा नाना पटोले यांनी दिली. यापूर्वी खासदार निधी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
माजी सभापती कलाम शेख यांनी पंचायत समिती अंतर्गत अभ्यास केंद्र बांधकामासाठी विशेष निधी गावात उपलब्ध करून दिला असल्याने या केंद्रातून अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत रूजू झाले आहेत. कार्यक्रमाचे संचालन राहुल डोंगरे, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मंगेश शहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद गलेवार यांनी केले. (वार्ताहर)