विद्यार्थीच स्वत:चे शिल्पकार

By admin | Published: December 30, 2014 11:29 PM2014-12-30T23:29:31+5:302014-12-30T23:29:31+5:30

साकोलीसारख्या ग्रामीण भागातील तुमच्या शाळेत आधुनिक तंत्रज्ञान व डिजीटलच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. स्वप्न पहा, स्वप्नामध्ये ताकद असते,

Students are their own artisans | विद्यार्थीच स्वत:चे शिल्पकार

विद्यार्थीच स्वत:चे शिल्पकार

Next

साकोली : साकोलीसारख्या ग्रामीण भागातील तुमच्या शाळेत आधुनिक तंत्रज्ञान व डिजीटलच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. स्वप्न पहा, स्वप्नामध्ये ताकद असते, गरीबीतूनच विद्यार्थी घडतात, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मैत्रीचा सल्ला द्यावा, विद्यार्थी स्वत:च शिल्पकार असतात, असे प्रतिपादन मोरेश्वर मेश्राम यांनी केले. कटकवार विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्था सचिव विद्या कटकवार होत्या. यावेळी विशाल कटकवार, मेजर शिबानी ढोलकिया, सरसराम मोहबे, भय्यालाल तांडे, प्रा.विनय बाळबुद्धे, स्वागताध्यक्ष प्रभारी प्राचार्य उत्तम गायधने, स्नेहसंमेलनप्रमुख प्रा.के.एस. टेंभरे, संयोजक श्रीधर खेडीकर उपस्थित होते. याप्रसंगी विज्ञान प्रदर्शनी, ग्लोबल नेचर क्लब प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. जयंतराव कटकवार स्मृती पारितोषिक १० वी व १२ वीत प्रथम द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी सॉफ्टबॉल, बॉलबॅडमिंटन, व्हॉलीबॉल, क्रिकेट या खेळातून नऊ विद्यार्थी राज्यस्तरावर भाग घेतला. त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राज्यस्तरावर ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभाग झालेली तिसरीची विद्यार्थीनी पल्लवी चौधरी हिचा सत्कार करण्यात आला. संचालन शिवदास लांजेवार व बाळकृष्ण लंजे यांनी केले. कार्यक्रमासाठी अशोक कापगते, हिवराज येरणे, संजय भेंडारकर, मनिषा काशिवार, बोरकर, गेडाम, प्रा.अशोक गायधने, प्रा.प्रशांत शिवणकर, प्रा.के.टी. कापगते, शाहीद कुरैशी, दिनेश उईके, शिवपाल चन्ने, विठ्ठल सुकारे, भोजराम मांदाळे, विनोद तिडके, सुरेश भुरे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Students are their own artisans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.