विद्यार्थ्यांनो, खेळांमधून नाव उज्ज्वल करा
By admin | Published: December 24, 2015 12:39 AM2015-12-24T00:39:08+5:302015-12-24T00:39:08+5:30
विद्यार्थ्यांनी रोज अभ्यासाबरोबरच खेळले पाहिजे. खेळण्यामुळे शीरर दणकट व मजबूत होते. मन प्रसंन्न राहते.
लाखनीत क्रीडा स्पर्धा जानेवारीत स्वर्णिम सोहळा, ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांचे प्रतिपादन,
लाखनी : विद्यार्थ्यांनी रोज अभ्यासाबरोबरच खेळले पाहिजे. खेळण्यामुळे शीरर दणकट व मजबूत होते. मन प्रसंन्न राहते. शालेय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामधील विविध खेळामध्ये सहभागी होवून विद्यार्थ्यांनी खेळातून आपल्या विद्यालय व संस्थेचे नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन लाखनीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांनी केले.
बापुसाहेब लाखनीकर जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त लक्ष्मीबाई कन्या विद्यालय लाखनी येथे संस्था अंतर्गत घटक शाळामधील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर होते. यावेळी कार्यवाह न.ता. फरांडे, तहसिलदार डी.सी. बोंबुर्डे, तालुका क्रीडा संयोजक घ.शा. बिरनवार, उपाध्यक्ष मुरलीधर पाटील, भांडारकर, संस्था सदस्य मधुकर लाड, बाळासाहेब रणदिवे, पुरूषोत्तम खेडीकर उपस्थित होते.
याप्रसंगी ठाणेदार चकाटे म्हणाले, विद्यार्थी असताना आपणही राज्यस्तर व विद्यापीठ स्तरावरील खेळांच्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळेचे काही प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. रोज सकाळी उठून विद्यार्थ्यांनी खेळण्याचा सराव करावा.
यावेळी संस्थेचे कार्यवाह न.ता. फरांडे म्हणाले, राज्यस्तरिय स्पर्धेत या संस्थेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ही अभिमानाची बाब असून स्वदेशी खेळांचे जीवनात अनन्यसाधारण महत्व होते. गेल्या दहा वर्षात हे क्रीडा महोत्सव संस्थास्तरावर आयोजित केले जात असल्याचे सांगितले.
तहसिलदार बोंबर्डे यांनी विद्यार्थ्यांना खेळा व स्वस्थ जीवन जगा असा संदेश दिला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर म्हणाले, हे वर्ष बापुसाहेब लाखनीकर जन्मशताब्दी वर्ष असून समर्थ विद्यालयाचे अमृतमाहेत्सवी वर्ष आहे. जानेवारी २०१६ च्या शेवटच्या आठवड्यात लाखनी येथे स्वर्णिम सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना संधी मिळते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. अभ्यास व खेळ जीवनात आवश्यक असल्याचे मत मांडले. प्रास्ताविक बाबुराव निखाड यांनी तर आभारप्रदर्शन संयोजक प्रा. विकास खेडीकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)