परीक्षा दालनात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची होणार नोंद
By admin | Published: March 10, 2017 01:39 AM2017-03-10T01:39:20+5:302017-03-10T01:39:20+5:30
परीक्षा दालनात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद ठेवण्याचे आदेश नुकतेच धडकले असून उशिरा येणाऱ्या
शिक्षण मंडळाचा निर्णय : तुमसरात उशिरा येण्याचे सत्र सुरूच
तुमसर : परीक्षा दालनात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद ठेवण्याचे आदेश नुकतेच धडकले असून उशिरा येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद प्रपत्र ब मध्ये ठेवून त्यांचे संकलन परिरक्षक केंद्रामार्फत विभागीय मंडळाकडे दररोज सादर करण्याचे आदेश निर्गमीत झाले आहे. व्हायरल होणाऱ्या प्रश्नपत्रिकेवर आळा घालण्याकरिता शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला.
इयत्ता १० व १२ च्या वार्घिक पीरक्षा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू आहेत. शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा व्हावी तथा व्हायरल प्रश्नपत्रिका होऊ नये याकरिता कदम नियम व पावले उचलली. यावर मात करीत प्रश्नपत्रिका व्हायरल होत आहेत. अनेक परीक्षा केंद्रावर परिक्षार्थी दररोज उशिरा येतात. उशिरा येण्याचे नेमके कारण केंद्र संचालन व परीक्षा उपसंचालकाला माहित आहे. नियमानुसार परीक्षा सुरू झाल्यानंतर ३० मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जातो. या संधीचा फायदा अनेक विद्यार्थी सध्या घेत आहेत.
याची गंभीर दखल राज्य शिक्षण मंडळाने घेतली. सकाळी १०.४५ ते ११ दरम्यान प्रश्नपत्रिका मुख्यत: हॉयरल होत आहेत. त्यामुळे यापुढील सर्व परीक्षा कालावधीत सकाळ सत्रात १०.४५ नंतर व दुपार सत्रात २.४५ नंतर परीक्षा दालनात येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंद प्रपत्र ब मध्ये ठेवून त्यांचे संकलन परीक्षक केंद्रामार्फत विभागीय मंडळात करण्यात यावे तथा विभागीय मंडळांची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळास दररोज करण्याचे निर्देश दिले आहेत.
तुमसर शहर व तालुक्यात बहुसंख्य विद्यार्थी उशिरा परीक्षा केंद्रावर येत असल्याची माहिती आहे, परंतु त्यांची स्वतंत्र नोंद घेतली जात नाही. परिक्षार्थ्यांनी सकाळपाळीत १०.३० वाजता परीक्षा दालनात प्रवेश करणे अपेक्षित आहे. १०.५० ला प्रश्नपत्रिका व विहित करणे आवश्यक आहे. दररोज सकाळपाळीत ११ वाजेनंतर अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर धावत येतात. नेमके दररोज उशिरा येण्याचे कारण काय आहे हे सर्वांना माहिती आहे. दुपारपाळीतही हेच सुरू आहे. विभागीय परीक्षा मंडळाने परीक्षा दालनात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद काटेकोरपणे ठेवली तर उशिरा येणाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याशिवाय राहणार नाही. परंतु असे होतानी दिसत नाही. दररोज ११ नंतर परीक्षा दालनात येण्याची परंपरा तुमसरात मागील तीन वर्षापासून सुरू आहे हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)