पोषण आहाराची भांडी घासतात विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 10:51 PM2017-09-17T22:51:44+5:302017-09-17T22:52:49+5:30
शाळा बंद आंदोलनाचा इशारा : शिक्षिकेच्या बदलीवर अडले ग्रामस्थ, धानला येथील प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी/भंडारा : लाखनी पंचायत समिती अंतर्गत येणाºया धानला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थीच शालेय पोषण आहाराची भांडी घासत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकिला आली आहे. हा प्रकार काही दिवसांपासून सातत्याने घडत असताना बिंग फुटताच पालकांच्या संयमाचा बांध फुटला.
धानला येथील या शाळेत वर्ग १ ते४ आहे. शाळेमध्ये एक महिला मुख्याध्यापीका व अन्य दुसरी महिला शिक्षक कार्यरत आहे. मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेमध्ये पटत नसल्यामुळे त्याचा फटका येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून सहन करावा लागत असल्याचेही समोर आले आहे. प्रत्येक शाळेला खिचडी पुरविणे व मदतनीस म्हणून महिला कामाला ठेवणे बंधनकारक असताना शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारांतर्गत बनविण्यात येणाºया खिचडीसह इतर पोषण आहाराचे भांडे शाळेतील विद्यार्थ्यांकडूनच घासुन घेण्याचा प्रकार उघडकिला आला.
विद्यार्थ्यांकडून भांडे घासून घेण्याचा प्रकार शाळेतील मुख्याद्यापीका करत होत्या. त्याप्रकाराला विद्यार्थ्यांच्या पालकांचा विरोधाला न जुमानता सदर मुख्याध्यापिकेने पालकांशी असभ्य भाषेत वर्तणूक करून हा प्रकार सतत सुरूच ठेवला. त्याचप्रकारे शाळेत स्वच्छतागृह असूनही मुलांना त्याचा उपयोग करण्यास मज्जाव केला. मुख्याध्यापिका स्वत: स्वच्छतागृहाला कुलूप लावून ठेवत असल्याचा सुद्धा प्रकार समोर आला आहे.पालकांनी मुख्याधिपकेची बदली करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सात दिवसांच्या आत सदर मुख्याधिपिका शिक्षकेवर कार्यवाही करून तिची बदली न झाल्यास ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आशयाचे पत्रही इंजि.विशाल भोयर यांच्या नेतृत्वात देण्यात आले आहे. यात अनिल बावनकुळे, सुरज भांडारकर, सुनील भांडारकर, शमीम आकबानी, अतुल वाघाये, लोकेश सिगणझुडे, नितेश गायधने, अश्विनी भिवगडे, सुरेश निर्वाण, प्रिया हुमने, सुरेश निर्वाण, श्याम झलके,हरी झेलपुरे, हरीचंद्र मंडाले, सविता सरोते,जयश्री पडोळे,सुमीन ठोमरे,मंदा झलके,वर्षा झलके उपस्थित होते
सदर घटनेची चौकशी करुन कारवाई केली जाणार आहे. विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांना सुचना दिल्या आहेत. पोषण आहार योजनेद्वारे मुलांना भोजन दिले जाते. भांडे घासणे व जेवण वाढणे यासाठी स्वतंत्र महिलेची नियुक्ती केली जाते.
-दिलीप वाघाये,
गटशिक्षणाधिकारी, पं.स. लाखनी