शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:07 AM2017-12-14T01:07:25+5:302017-12-14T01:08:24+5:30

शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीकरिता कर्ज काढावे की मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढावे, असा प्रश्न त्याच्यापुढे उभा असताना सरकारने विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून शिष्यवृत्तीचे वाटप केले

Student's Front for Scholarship | शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा

Next
ठळक मुद्देपवनीत आंदोलन : जिल्हाधिकाºयांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीकरिता कर्ज काढावे की मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढावे, असा प्रश्न त्याच्यापुढे उभा असताना सरकारने विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून शिष्यवृत्तीचे वाटप केले नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. शिक्षण सोडण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा पवनी तालुका तर्फे शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा पवनी तहसील कार्यालयावर बुधवारी धडकला.
मोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता चुटे रंगमंदिर येथून झाली. मोर्चात सहभागी होण्याकरिता विद्यार्थी शाळेच्या गणवेशात सकाळपासूनच सुरुवात झाली. १० पर्यंत शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी जमा झाल्यानंतर मोर्चास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी घोषणा देवून पवनी शहर दणाणून सोडले. मोर्चा मार्गक्रमण करीत डॉ.आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गाने तहसील कार्यालयाजवळ पोहचताच पोलिसांनी अडविल्यामुळे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेला आयोजकांनी व विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करून तहसीलदारांनी आंदोलनस्थळी येण्याची मागणी करण्यात आली.
दुपारी १.३० वाजता पवनीचे तहसीलदार गजानन कोकुडे यांनी आंदोलनकरी विद्यार्थ्यांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारून ते सरकारपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिलयानंतर आंदोलन संपविले. निवेदनात दोन वर्षापासून थकीत असलेली शिष्यवृत्ती द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कपात न करता द्यावी व क्रिमिलीअरची अट रद्द करावी, ओबीसी जनगणना प्रकाशित करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चाचे नेतृत्व बीआरव्हीएमचे विदर्भ संयोजक इंजि. संजय मगर, राजू झोडे, योगेश शेंडे, स्वप्नील मेश्राम, देवेश शेंडे, ऐश्वर्या दहिवले, श्रीकांत शहारे यांनी केले. मोर्चात अश्विन मेश्राम, श्रीकांत देशमुख, चंद्रकांत देशपांडे, मनू पचारे, हरीश उकरे, वासंती भुरे, पवन शेंडे, त्रिरत्न रामटेके, कार्तीक अन्नपुर्णे, प्रज्ञा मेश्राम, आशिष भुरे, अक्षय लकडस्वार, शुभम माथूरकर, पंकज पडोळे आदी उपस्थित होते.

Web Title: Student's Front for Scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.