विद्यार्थी धडकले पंचायत समितीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 05:00 AM2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:21+5:30
जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा सिंदीपार/मुंडीपार या शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाकरीता जावयाचे असल्यास शाळा बंद करून जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा सिंदीपार येथे इयत्ता पहली ते चवथीपर्यंत २५ विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहे. या शाळेत दोन शिक्षक कार्यरत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : सांगुनही शिक्षकाची नियुक्ती होत नसल्याने सिंदीपार (मुंडीपार) या शाळेतील संतप्त झालेले विद्यार्थी लाखनी पंचायत समिती कार्यालयात धडकले. विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी पंचायत समितीवर धडक देवून आपल्या मागणीकडे अधिकाऱ्यांने लक्ष वेधले. यासाठी विद्यार्थ्यांना अनेक पदाधिकाऱ्यांनी धीर देत लवकरच शिक्षक देण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक नागरिकांसह शिक्षकांमधून होत आहे.
जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा सिंदीपार/मुंडीपार या शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाकरीता जावयाचे असल्यास शाळा बंद करून जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा सिंदीपार येथे इयत्ता पहली ते चवथीपर्यंत २५ विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहे. या शाळेत दोन शिक्षक कार्यरत होते.
परंतु नोव्हेंबर २०१९ मध्ये किशोर कमाने यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे एकाच शिक्षकावर संपूर्ण शाळेची जबाबदारी आली. मात्र त्यानंतर अधिकाºयांकडून दुसरा शिक्षक शाळेसाठी देण्यात आले नाही. अनेकदा कार्यालयीन कामकाजाकरिता पंचायत समिती तसेच केंद्र शाळेमध्ये जावे लागते. अशावेळी विद्यार्थ्यांना कोणाच्या भरशोवर सोडून जायचे, असा प्रश्न सदर शिक्षकाला गत काही दिवसांपासून सतावत आहे. कठोर मनाने काही प्रसंगी शाळा बंद करून कार्यालयीन कामकाजाकरिता जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शिक्षकांच्या मागणीकरिता यापूर्वी अनेकदा पालकांनी निवेदन दिले आहे. पंचायत समिती लाखनी येथील शिक्षण विभागात अनेकदा निवेदन देवूनही शिक्षक न मिळाल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत शिक्षक दिला जात नाही. तोपर्यंत इथेच पंचायत समितीच्या आवारात शाळा भरविणार, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला.
विद्यार्थ्यांनी पंचायत समिती प्रशासनास माहिती देवून येथेच शाळा भरविली असल्याचे निदर्शनास येताच अधिकाºयांना आश्चर्याचा धक्का बसला. ३० सप्टेंबर रोजी पटपडताळणीत मुरमाडी तुप येथे जी. जी. झलके हे सहायक शिक्षक अतिरिक्त ठरल्याने त्यांना आठवडाभरापुर्वीच सिंधीपार शाळेत रूजू होण्याचे पत्र देण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी बावनकुळे यांनी सांगितले.
मात्र वरिष्ठांचा आदेश असतानाही अद्याप सदर शिक्षक का रूजू झाले नाही हा संशोधनाचा विषय ठरत आहे. मागण्यांच्या पुर्ततेसाठी चिमुकल्यांनी पंचायत समिती आवारात भरविलेली शाळा तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.