मोहाडी येथे विद्यार्थिनीच्या प्रामाणिकपणाचे कौतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 09:12 PM2018-12-16T21:12:30+5:302018-12-16T21:12:47+5:30
रस्त्यावर मौल्यवान वस्तू, पैसे पडले दिसले तर चटकन ते साहित्य खिशात घालविण्याची प्रवृत्ती पावलोपावली दिसते. पण एका विद्यार्थिनीला चक्क रुपये असलेला व काही महत्वाचे दस्ताऐवज असलेला पॉकीट सापडला. त्या मुलींना कोणताही मोह न होता तो पाकीट मोहाडी पोलीस ठाण्यात जमा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : रस्त्यावर मौल्यवान वस्तू, पैसे पडले दिसले तर चटकन ते साहित्य खिशात घालविण्याची प्रवृत्ती पावलोपावली दिसते. पण एका विद्यार्थिनीला चक्क रुपये असलेला व काही महत्वाचे दस्ताऐवज असलेला पॉकीट सापडला. त्या मुलींना कोणताही मोह न होता तो पाकीट मोहाडी पोलीस ठाण्यात जमा केला.
बालपणातील संस्काराची जडणघडण झाली. त्याचा प्रत्यय कुठेतरी दिसायला लागतो. अशीच प्रामाणिकपणा या संस्काराच्या नात्याशी जुळलेली कुशारी येथील कल्याणी गाढवे. कल्याणी ही शाळेत येत असताना तिला कुशारी फाट्यावर पॉकीट दिसला. त्यात काही रुपये, एटीएम कार्ड, वॉरंट आदी वस्तू होत्या. तसाच तो पॉकीट उचलून कल्याणीने मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. पोलिसांना पॉकीट असणाऱ्याचा शोध लावला. तो पॉकीट पूर्वी बीएसएफ व आता राष्ट्रीय आपदा मोचन बलात काम करणारा आंधळगाव येथील भूमेश बनकर यांचा होता. त्या दोघांना ठाण्यात बोलावून घेतले. कल्याणीला सापडलेला पॉकीट पोलिसांनी भूमेश बनकरच्या स्वाधीन केले. मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी कल्याणीचे कौतूक केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक थेटे यांची उपस्थिती होती.