नेटवर्कसाठी खरबी नाका येथे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:34 AM2021-03-19T04:34:39+5:302021-03-19T04:34:39+5:30
राष्ट्रीय महामार्ग हा गावातील सर्वात उंच भाग आहे. त्यामुळे किमान तेथे तरी नेटवर्क मिळेल आणि आपली अभ्यासाची ...
राष्ट्रीय महामार्ग हा गावातील सर्वात उंच भाग आहे. त्यामुळे किमान तेथे तरी नेटवर्क मिळेल आणि आपली अभ्यासाची समस्या सुटेल म्हणून विद्यार्थी रात्री, दिवसा महामार्गाचा आधार घेत आहेत. मात्र अशास्थितीत भरधाव वेगाने येणारी वाहने ही या विद्यार्थ्यांना धोकादायक ठरू शकतात. मात्र मोबाईल सदर कंपनीचे मात्र याकडे गेल्या वर्षभरापासून दुर्लक्ष होत आहे. खरबी, खराडी, चिखली, ठाणा, निहारवाणी, परसोडी, राजेदहगाव परिसरात मोबाईल नेटवर्कने ग्राहक त्रस्त आहेत. यासाठी खरबीचे उपसरपंच संजय आकरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व अन्य मान्यवरांनी अनेकदा नेटवर्क सुरळीत करण्यासाठी निवेदने दिली. इतकेच नव्हे तर तालुका, जिल्हा प्रशासनाकडेही तक्रार केली. मात्र यावर आजही तोडगा निघू शकलेला नाही. कोरोना संसर्ग कालखंडात सर्वच कामे ऑनलाईन झाली आहेत. मात्र नेटवर्कअभावी या परिसरातील शेतकरी नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, पालक त्रस्त झाले असतानाही संबंधित कंपनी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.