विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान आवश्यक
By admin | Published: April 20, 2015 12:48 AM2015-04-20T00:48:36+5:302015-04-20T00:48:36+5:30
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात वावरत असताना गुरूचा आदर करावा.
कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम : भरतकुमार पारधी यांचे प्रतिपादन
भंडारा : विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात वावरत असताना गुरूचा आदर करावा. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने माणसाला गरूड झेप घेता येवू शकते. गरजेनुसार संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी गटशिक्षणाधिकारी भरतकुमार पारधी यांनी केले. राजीव गांधी चौकात आयोजित कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पुस्तक वितरण प्रसंगी बोलत होते.
यावेळी नेटवर्कींगचे शिक्षक गणेश नंदनवार, विलास केझरकर, मिरज कापसे, समीर नवाज उपस्थित होते. संचालन प्रणिता पाचखेडे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वितरण करण्यात आले. आभार वसीम खान यांनी मानले. कार्यक्रमासाठी अवेश खान, भारती जांभुळकर, योगेश लांजेवार, कविता अंडेल, योगिता सतीमेश्राम, आशिका चवरे, अनुताई मेश्राम, शिल्पा मेश्राम, रजनी बसेशंकर, प्रियंका गोस्वामी, वर्षा गजभिये, रोहित रामटेके, मनोज बोरकर, निकता खोब्रागडे, स्रेहा श्यामकुंवर, रोहित वैद्य, जितेंद्र खोब्रागडे, आशिष इंगोले, ममता इंगोले आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)