आनंददायी शिक्षणात रमले विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2016 12:35 AM2016-07-06T00:35:22+5:302016-07-06T00:41:48+5:30
बालभारतीच्या मराठी अभ्यास समितीचे सदस्य स्मिता गालफाडे व अकोला जिल्ह्यातील बालभारतीचे ....
बालभारती सदस्यांची शाळेला भेट : कवितांचे स्वरबध्द सादरीकरण
आसगाव : बालभारतीच्या मराठी अभ्यास समितीचे सदस्य स्मिता गालफाडे व अकोला जिल्ह्यातील बालभारतीचे सदस्य मयुर लहाने यांनी आसगाव जिल्हा परिषद हायस्कूल व भंडारा लाल बहाद्दूर शास्त्री शाळेतील सहावीच्या वर्गांना भेट दिली.
सहावीचे मराठीच्या पाठ्यपुस्तका विषयीचा दृष्टीकोन जाणून घेतला. मराठीचे पाठ्यपुस्तक, त्यातील चित्र, कविता, छपाई, आकार, पाठ्यांश, स्वाध्याय, कृती, दफ कोड, नाविन्यपूर्ण उपक्रम, याविषयी मुलं व शिक्षक दिलखुलास चर्चा केली.
या पाठ्यपुस्तकातील नव्यानेच आलेले दफ कोड तंत्रज्ञान हे नवे आकर्षण पालक व मुलांना समाधान कारक वाटले. पुस्तक नव्या तंत्रज्ञानाशी जोडल्या गेले हे समाधान शिक्षक, जगदिश भुरे व शिक्षिका नीता भोंगाडे यांनी व्यक्त केले.
मुलांना ज्ञानरचनावादी दृष्टीकोनातून अध्ययन करता यावे यास्तव अनेक कृती या पाठ्यपुस्तकात आहेत व त्या विद्यार्थ्यांना आवडत आहेत असे शिक्षक बोलले. कविता हे ही या पाठ्यपुस्तकाचे व मुलांना कविता चालीत गाता याव्यात म्हणून सात कवितांना स्मिता गालफाडे यांनी कविता स्वरबद्ध केल्या.
व्हर्चुअल प्रशिक्षणातून त्या आख्ख्या महराष्ट्रातील शिक्षकांपर्यंत गेल्या त्यातीलच इंदिरा संत यांनी लिहिलेली कविता ‘रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुलारे गवत फुला’ ही कविता त्यांनी मुलांकडून गाऊन घेतली.
लाल बहाद्दूर शास्त्री शाळेचे प्रभारी प्राचार्य, डि.व्ही देशमुख व आसगावचे प्राचार्य बी.बी. बावने यांनी स्वागत केले. पाठ्यपुस्तकाची बांधणी, आकाराचे प्रथमच दर्जेदार पुस्तक तयार झाले असे मत दोन्ही प्राचार्यांनी व्यक्त केले. मयुर लहाने यांनी पाठ्यपुस्तक निर्माणाच्या वेळचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. मुलांकडून आनंददायी खेळ पण शिकवले. एम.टी. धानगाये यांनी सदस्यांचे आभार मानले. (वार्ताहर)