शाळेचा उंबरठा न ओलांडताच विद्यार्थी पोहोचले दुसरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:33 AM2021-04-13T04:33:34+5:302021-04-13T04:33:34+5:30

शासनाच्या धोरणानुसार, विद्यार्थी दुसरीमध्ये जाऊनही त्या विद्यार्थ्याला प्रथम ज्या शिक्षणाची गरज आहे त्या अ,ब,क,ड अक्षरांच्या ओळखीपासून विद्यार्थी दूर गेला ...

The students reached the second without crossing the school threshold | शाळेचा उंबरठा न ओलांडताच विद्यार्थी पोहोचले दुसरीत

शाळेचा उंबरठा न ओलांडताच विद्यार्थी पोहोचले दुसरीत

Next

शासनाच्या धोरणानुसार, विद्यार्थी दुसरीमध्ये जाऊनही त्या विद्यार्थ्याला प्रथम ज्या शिक्षणाची गरज आहे त्या अ,ब,क,ड अक्षरांच्या ओळखीपासून विद्यार्थी दूर गेला आहे. त्यामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शासनाने शाळा बंद करून त्याऐवजी ऑनलाइन शिक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे; मात्र या शिक्षण प्रणालीचा आदिवासी, दुर्गम व ग्रामीण भागात काहीच उपयोग होत नाही.

कारण या भागात गरीब व शेतमजूर मोठ्या प्रमाणात आहेत. ही मंडळी सतत कामाच्या शोधात भटकंती करीत असतात. त्यांची मुले खेळण्यात व्यस्त असतात. कोणत्याही कुटुंबाकडे स्मार्टफोन असेल तर त्यांच्याकडे फोनला कनेक्टिव्हिटी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण प्रणालीपासून विद्यार्थी अलिप्त राहिले आहेत.

मागील वर्षीच्या पहिल्या वर्गातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी अजूनही शाळेचे तोंड बघितले नसताना दुसऱ्या वर्गात वर्गोन्नती देण्याचा शासनाने निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शैक्षणिक विकासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The students reached the second without crossing the school threshold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.