विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी एक पाऊल पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:35 AM2021-03-10T04:35:39+5:302021-03-10T04:35:39+5:30

संजय लेनगुरे : ऑनलाइन जागतिक महिला दिन तुमसर: आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा कुठेच कमी नाहीत, ...

Students should take a step forward for their own existence | विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी एक पाऊल पुढे यावे

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी एक पाऊल पुढे यावे

Next

संजय लेनगुरे : ऑनलाइन जागतिक महिला दिन

तुमसर: आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा कुठेच कमी नाहीत, स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज असावे .ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून मिळालेली संधी ही पुन्हा पुन्हा येणारी संधी नसून, ऑनलाइन उपक्रमांना सक्रिय सहभाग द्यावा आणि स्वतः च्या अस्तित्वासाठी एक पाऊल पुढे यावे, असे प्रतिपादन प्रा. लेनगुरे यांनी केले. स्थानिक नगर परिषद नेहरू कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथील मराठी विभागाने आयोजित केलेल्या ऑनलाइन जागतिक महिला दिन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्राचीन स्त्री आणि वर्तमानकालीन स्त्री यांच्यातील दुरावा कायम नष्ट व्हावा आणि आधुनिक काळात तर महिलांनी पुरुषांबरोबर आपले शैक्षणिक कार्य अविरत सुरू ठेवावे म्हणजे स्त्री-पुरुष समानता हे ब्रीद कायम अस्तित्वात राहील, असेही मत मांडले.

यावेळी कुणाल बांडेबुचे, शुभांगी कीरपाने, गुलशन गौपाले, महक बनसोड, मंथन बडवाईक, दामिनी पटले यांनीही महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य भारत थोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून सतीश बडवाईक, कल्पना मलेवार, रमेश बोंद्रे उपस्थित होते . या कार्यक्रमाला विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निकिता नागफासे यांनी तर आभार अभय मस्करे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता लता उमाटे, नलिनी धुर्वे, एस ए. रिझवी, आर.आर.भुजाडे, चंदा पडोळे, रेणू नंदनवार, निरंजना गायकवाड, भावना राऊत, सोमा रायकवार, फुंड प्रकाश बामण, अविनाश गजबे, मंगेश ढोके, राम श्रावणकर, सतीश मलेवार, सुधीर चन्ने यांनी प्रयत्न केले.

Web Title: Students should take a step forward for their own existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.