ध्येयप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:14 AM2017-12-31T00:14:29+5:302017-12-31T00:14:56+5:30
मनुष्यस्वभाव सतत शिकण्याचा आहे. अखेरच्या श्वासापर्यंत शिक्षण आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्ती करीता परिश्रम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पशुसंवधृन सहायक संचालक डॉ. कृपाचार्य बोरकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मनुष्यस्वभाव सतत शिकण्याचा आहे. अखेरच्या श्वासापर्यंत शिक्षण आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्ती करीता परिश्रम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पशुसंवधृन सहायक संचालक डॉ. कृपाचार्य बोरकर यांनी केले.
जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या तीन दिवसीय स्रेहसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिताराम खोब्रागडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त उपप्राचार्य जी.जे. चव्हाण, सेवानिवृत्त प्रा. वसंत सार्वे, भास्कर बडवाईक, सामाजिक कार्यकर्ते दिलीप सार्वे उपस्थित होते.
स्रेहसंमेलन स्रेह, आपूलकी तथा आनंद मेळावा असून विद्यार्थी सुप्तगुणांचे प्रदर्शन करतात. विद्यार्थी जीवन आनंद व परिश्रम याचा मेळ आहे, असे प्राचार्य मिताराम खोब्रागडे यांनी सांगितले. प्रा. वसंत सार्वे यांनी विद्यार्थ्यांनी आपले उद्दिष्ट साध्य करावे असे सांगितले. सेवानिवृत्त उपप्राचार्य चव्हाण यांनी विद्यार्थी जीवनात अभ्यासात सातत्य ठेवित तोच यशस्वी होईल, असे सांगितले. उद्योजक दिलीप सार्वे यांनी शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून व्यक्तीमत्व घडविणारे प्रशिक्षण आहे, असा उपदेश दिला.
सर्वप्रथम सरस्वती तथा संस्थेचे संस्थापक स्व. श्यामसुंदर बोरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. उमवली सोनेरी आज पहाट या स्वागत गीताने सर्वांचे मत मोहून घेतले. तीन दिवसीय स्रेहसंमेलनात रांगोळी स्पर्धा, पुष्परचना, चित्रकला, समूहनृत्य, बौद्धिक स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे. संचालन प्रा. एन.टी. कापगते, प्रा. आशिष खोब्रागडे, अतिथींचा परिचय प्रा. मोहन भोयर, प्रास्ताविक व आभार प्रा. विद्यानंद भगत यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. शशिकला पटले, प्रा. नितीन पाटील, प्रा. गणेश चाचीरे, प्रा. सविता बोरकर, धमेंद्र कोचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनीनी सहकार्य केले.