आत्मसमर्पित भावनेने विद्यार्थ्यांनी कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:44 AM2021-07-07T04:44:14+5:302021-07-07T04:44:14+5:30
कोंढा (कोसरा): काळानुरूप सर्वत्र बदल होत असला तरी सेवाव्रती भाव कायम असला पाहिजे. आत्मसमर्पित भावनेने विद्यार्थ्यांनी कार्य करावे, ...
कोंढा (कोसरा): काळानुरूप सर्वत्र बदल होत असला तरी सेवाव्रती भाव कायम असला पाहिजे. आत्मसमर्पित भावनेने विद्यार्थ्यांनी कार्य करावे, तसेच अध्यापकांच्या गुणवत्ता व पात्रतेचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष ॲड. आनंद जिभकाटे यांनी केले. येथील गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गतवर्षीच्या दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष ॲड. आनंद जिभकाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष रामदास शहारे, सहसचिव नरेंद्र कावळे, विश्वस्त विकास राऊत, माजी प्राचार्य सुभाष पडोळे, केंद्रप्रमुख विजय भुरे, विश्वस्त मनोहर देशमुख, सुदाम खंडाईत, नरेश जिभकाटे, माजी प्राचार्य के. एन. नान्हे, प्राचार्य डी. एच. चेटुले, सरपंच डॉ. नूतन कुर्झेकर आदी उपस्थित होते.
यावेळी संस्थेतून सेवानिवृत्त झालेले एल. एन. काटेखाये व किशोर ढोरे यांचा सपत्नीक प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गतवर्षी दहावीच्या वर्गात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतलेले प्रतीक्षा धनपाल जिभकाटे, अर्पिता विलास सुपारे, राणी मधुकर धारगावे, किरण दिलीप माहुरे, सोनू लक्ष्मण चंदनबावने आणि अनमोल राजू मोहरकर यांचा प्रमाणपत्र व रोख पाच हजार रुपये देऊन संस्थेतर्फे ॲड. जिभकाटे यांनी सत्कार केला. सत्कारमूर्ती एल.एन. काटेखाये व किशोर ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डी. एस. चेटुले यांनी, तर संचालन राम भोपे यांनी केले. आभार श्रीकांत खुर्जेकर यांनी मानले. कार्यक्रमास माजी प्राचार्य थेरे, प्रा. चरणदास बावणे, तसेच विद्यालयातील प्राध्यापक, अध्यापक, अध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.