जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचा डोंग्याने प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 11:58 PM2018-07-09T23:58:30+5:302018-07-09T23:58:49+5:30
एकीकडे देशात डिजिटल क्रांती आणून देशातील प्रत्येक खेड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देशातील अशी अनेक खेडी आहेत ज्याकडे शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अशा वंचित शहराचा विकास खुंटला आहे. विकासाच्या प्रवाहापासून ही गावे कोसो दूर आहेत. अशा गावातील नागरिक नरकयातना सारखे जीव जगत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : एकीकडे देशात डिजिटल क्रांती आणून देशातील प्रत्येक खेड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देशातील अशी अनेक खेडी आहेत ज्याकडे शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अशा वंचित शहराचा विकास खुंटला आहे. विकासाच्या प्रवाहापासून ही गावे कोसो दूर आहेत. अशा गावातील नागरिक नरकयातना सारखे जीव जगत आहेत. भंडारा जिल्ह्याच्या टोकावरील लाखांदूर तालुक्यातील आवळी गावाची अशीच भयावह स्थिती आहे.
एकीकडे वैनगंगा तर दुसरीकडे चुलबंद अशा दोन नद्यांच्या मध्यभागी वसलेल्या आवळी गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त असल्याने या गावातील नागरीक स्वातंत्र्यपूर्व काळापासुन विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. आवळी हे गाव गटग्रामपंचायतीमध्ये येत असून सन १९६२ ला गट ग्रामपंचायत उदयास आली. आवळी आणी टेंभरी हे दोन गाव विहीरगावला जोडण्यात आले, गावाला बेटाचे स्वरुप प्राप्त असल्याने गावात पूर येत असतो. त्यामुळे गावाचे इंदोरा येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र या मातीत रूजलेल्या पुर्वजांच्या आठवणी व गावावरच्या प्रेमामुळे काही लोक आजही आवळी येथे राहत आहेत.
आवळी येथे आजपर्यत अनेक सरपंच व सदस्य होऊन गेले. तरी देखील गावाचा विकास होऊ शकला नाही. विहीरगाव येथे ग्रामपंचायतची ईमारत असल्याने वर्षातील आठ महिने आवळी वासियांना विहीरगावला येताना डोंग्याने प्रवास करावा लागतो. पावसातील चार महिने नागरीकांसह विद्यार्थ्यांना नरकयातना असतात.
या गावामध्ये पहिली ते चौथीपर्यत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असुन पुढील शिक्षणाकरीता येथील विद्यार्थ्यांना सोनी, लाखांदूर, वडसा येथे जावे लागत असते, विद्यार्थ्यांसह येथील नागरीक दुचाकी, सायकल सोनीमध्ये ठेऊन, आवळी वरून चुलबंद नदी घाटापर्यत पायी येत असतात. रूग्नाला दवाखाण्यात उपचारासाठी वेळेवर नेता येत नाही त्यामुळे जिव गमवावा लागत असतो.
आवळी गाव पुनर्वसीत असताना येथे ईतर कामांना मंजुरी देता येते. मग पुलाच्या कामासाठी का देता येत नाही? आपण सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून, आवळीच्या विकासासाठी प्रशासनाकडून आवळीवासीयांची पिळवणूक होत आहे. माजी खासदार नाना पटोले ग्रामस्थांच्या पाठिशी असल्यामुळे येथील लोक हिमतीने जीवन जगत आहेत. आ.काशिवार यांनी पुढाकार घेऊन पुलाचे काम पुर्ण करावे.
- प्रणाली ठाकरे, जि.प. सदस्य.