मीडिया अँड एंटरटेन्मेंट विषयाला विद्यार्थ्यांना मुकावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:40 AM2021-08-20T04:40:44+5:302021-08-20T04:40:44+5:30
भंडारा : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई या शासन निर्णयानुसार सन २०१४-१५ पासून व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम राज्यातील ...
भंडारा : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई या शासन निर्णयानुसार सन २०१४-१५ पासून व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम राज्यातील सुमारे ५०० शासकीय शाळामध्ये प्रकल्प मान्यता मंडळाच्या मान्यतेने सुरू करण्यात आले.
योजनेतील मीडिया अँड एंटरटेनमेंट (ॲनिमेशन ) हा व्यावसायिक विषय इतर सामान्य विषयासह इयत्ता ९वी ते १२ वीपर्यंत शाळेत मुख्य विषय म्हणून शिकविला जातो. विषयांतर्गत दिले जाणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंरोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मार्गदर्शक ठरत आहे. विषय विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रामध्ये शिकण्यासाठी औरंगाबाद, पुणे, मुंबई, बंगळुरी, हैदराबाद येथे शिक्षण घेण्यासाठी जावे लागते त्यात खूप मोठी फीस द्यावी लागते. त्यामुळे वंचित विद्यार्थी ही फीस भरू शकत नाही. तसेच कार्टून कसे तयार करतात, ते कसे चालतात, कसे बोलतात. कार्टुनला कसे ॲनिमेट करतात याचे ज्ञान होते. परंतु महाराष्ट्र शासनाने सन २०२० ते २०२१ पासून मीडिया अँड एंटरटेन्मेंट बंद केल्याने विद्यार्थ्यांना इच्छा नसतानाही या विषयाला मुकावे लागणार आहे.
तसेच भंडारा जिल्हातील जिल्हा परिषद गांधी विद्यालय लाखनी, जि. प. हायस्कूल व ज्यु. कॉलेज चिचाळ, ता. पवनी, जि. प. हायस्कूल व ज्यु. कॉलेज नाकाडोंगरी, ता.तुमसर, जि. प. हायस्कूल व ज्यु. कॉलेज आसगाव, ता. पवनी या व्यवसाय शिक्षणाची सोय उपलब्ध असून, आजच्या स्पर्धेच्या युगात मीडिया अँड इंटरटेन्मेंट यांसारख्या ज्ञानाची नित्तांत गरज आहे. यासाठी मीडिया अँड एंटरटेन्मेंट (ॲनिमेशन ) हा विषय पुन्हा नव्याने सुरू व्हावा ही मागणी सर्वत्र होत आहे.