डोंगरदेव येथे बंधाऱ्याऐवजी बांधला रपटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 08:46 PM2018-11-18T20:46:15+5:302018-11-18T20:48:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क करडी (पालोरा) : सन २०१७-१८ मध्ये मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव तिर्थस्थळाशेजारील नाल्यावर तुमसर वनविभागाच्या वतीने जलयुक्त शिवार ...

Stump builder instead of bondage at Dongdaadeo | डोंगरदेव येथे बंधाऱ्याऐवजी बांधला रपटा

डोंगरदेव येथे बंधाऱ्याऐवजी बांधला रपटा

googlenewsNext
ठळक मुद्देआठ लाखांचा खर्च पाण्यात : जलयुक्त शिवार योजनेचा बट्ट्याबोळ

लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : सन २०१७-१८ मध्ये मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव तिर्थस्थळाशेजारील नाल्यावर तुमसर वनविभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कक्ष क्रमांक ८४ मध्ये अंदाजपत्रकीय ८ लाख ३७ हजार रुपये खर्चून सिमेंट नाला बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु बांधकाम बंधाऱ्याचे असताना त्याठिकाणी रपट्याचे बांधकाम करण्यात आल्याचे दिसून येते. बंधाºयाच्या पाणी साठविण्याचे जागी मोठ्या प्रमाणात मलबा साठून असल्याने बंधारा कोरडा पडला आहे. प्रकरणी चौकशीची व कारवाईची मागणी आहे.
जलयुक्त शिवार योजना पाण्याचा साठा निर्माण व्हावा, भूगर्भातील पातळी वाढावी व पाणी टंचाई दूर व्हावी या उद्देशाने कार्यान्वित करण्यात आली. परंतु शासनाच्या व विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टरला हरताळ फासण्याचे व संगनमताने कंत्राटदारांची पाठराखण करण्याचे काम डोंगरदेव सिमेंट नाला बांध प्रकरणी झाल्याचे दिसून येते. तुमसर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सीमेंट नाला बंधाऱ्याचे बांधकाम होतेवेळी कोणत्याही प्रकारचे सनियंत्रणाचे काम केले नाही. परिणामी आज बंधाऱ्याच्या ठिकाणी पाणी न साठविता बंधाऱ्याच्या पोटात मातीच साठविलेली आहे.
सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेतून डोंगरदेव तिर्थस्थळाजवळ पावसाळ्यात सीमेंट नाला बांधचे बांधकाम तुमसर वनविभागाच्या देखरेखीखाली कक्ष क्रमांक ८४ मध्ये करण्यात आले. बंधाºयासाठी अंदाजपत्रकीय ८ लाख ३७ हजार ७२० रुपये खर्ची घालण्यात आले. परंतु या बंधाऱ्याच्या वन्यजीवांना कोणताही उपयोग नाही. बंधाऱ्यात नावालाही पाणी साठविलेला नाही. पाण्याऐवजी बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात माती साठलेली आहे. त्यामुळे बंधारा दिसून न येता फक्त रपट्याचे बांधकाम झाल्याचे दिसून येते. बंधाºयाचे बांधकाम करताना खोदकामात निघालेली माती बंधाऱ्याच्या काठावर वरच्या दिशेने न टाकता नाल्यातच टाकण्यात आली. बांधकामही अंदाजपत्रकांना धाब्यावर बसवून करण्यात आले. प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.

सदर प्रकरणाची माहिती प्राप्त झालेली असून तथ्य दिसून येत आहेत. अंदाजपत्रकांना डावलून कामे झालेली असल्यास चौकशी करण्यात येईल.
-पी.जी. कोडापे, सहाय्यक उपवनसंरक्षक, भंडारा.
सीमेंट नाला बंधाऱ्याचे बांधकाम पावसाळ्यात आल्याने माती साठून आहे. कामाची पाहणी केली जाईल. नाल्यातील माती काढण्यासाठी कंत्राटदाराला सांगितले जाईल. बांधकामाचे ६० टक्के देयके कंत्राटदाराला देण्यात आली असून ४० टक्के रक्कम शिल्लक आहे. नाला खोलीकरण व आणखी एका नव्या बंधाऱ्याचे काम होणे बाकी आहे.
-अरविंद जोशी, वनपरिक्षेत्राधिकारी, तुमसर.

Web Title: Stump builder instead of bondage at Dongdaadeo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.