उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:14 AM2017-12-13T00:14:44+5:302017-12-13T00:15:44+5:30
सुदृढ आरोग्य ही मानवाची आवश्यक गरज आहे. मात्र साकोली येथील उपजिल्हा रूग्णालयाची अवस्था बघितल्यावर विदारक चित्र समोर येते.
संजय साठवणे ।
आॅनलाईन लोकमत
साकोली : सुदृढ आरोग्य ही मानवाची आवश्यक गरज आहे. मात्र साकोली येथील उपजिल्हा रूग्णालयाची अवस्था बघितल्यावर विदारक चित्र समोर येते. कोट्यवधी रूपये खर्चुनही उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या सुटल्या नाहीत, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे. मग रुग्णांना त्याचा खरोखरच लाभ मिळतोय का?, आरोग्य यंत्रणा खरोखरच पांगळी आहे का?, वैद्यकीय अधिकारी खासगी प्रॅक्टीस करतात, तर रूग्णांकडे दुर्लक्ष होत असताना, दुर्लक्ष का? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णांना औषधी मिळत नाही बऱ्याच औषधी रुग्णांना औषधी दुकानातून घ्यावी लागते. मागील बºयाच वर्षापासून या रुग्णालयाचा कारभार प्रभारी वैद्यकिय अधिकाºयांच्या भरोशावर चालत आहे.
वैद्यकिय अधिकाऱ्यांनी आपआपली खाजगी दवाखाने उघडली आहेत. पैशाच्या लालसेपोटी वैद्यकिय अधिकाºयांचे लक्ष या रुग्णालयापेक्षा खाजगी दवाखान्याकडेच जास्त असते.
रुग्णांचा वाटेतच जातो जीव
च्एखाद्या अपघात झाल्यास त्याच्यावर थातुरमातुर औषधोपचार करुन रेफर टू भंडारा सांगण्यात येते. या रेफर टु भंडाराच्या प्रकारात अनेक रुग्णांचा वाटेतच आपला जीव गमवावा लागला आहे.
मुलभूत सुविधांचा अभाव
जिल्ह्यातील सर्वात जुनी तालुका म्हणून साकोली तालुका नावलौकीकास आहे. याठिकाणी कुटीर रुग्णालयाचे रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. तेव्हा तालुकावासीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सुरवातीचा काळात या रुग्णालयात सर्व सोयीसुविधा व औषधी रुग्णांना बरोबर मिळत होत्या. त्यानंतर अल्पावधीतच या हे रुग्णालयच आजारी पउले. सध्या या रुग्णालयात वैद्यकिय अधिकाºयांपासून ते विज, पंखा, पिण्याचे शुध्द पाणी, शौचालयाचा अभाव आहे. रुग्णालयाचा मानाने येथे औषधोपचार मिळत नाही.
शवविच्छेदन उघड्यावर
या रुग्णालयात कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सोय नाही. रुग्णालयाची ईमारत जीर्ण झाली असुन स्टॅम्पचे टॅक्टर खाली पडत आहेत. साफसफाईकडे दुर्लक्ष आहे. शवविच्छेदनगृहाची अवस्था गंभीर आहे. बºयाचदा शवविच्छेदन हे बाहेर उघड्यावर करावे लागते.