तुमसर उपजिल्हा रुग्णालय ठरले दुसऱ्यांदा अव्वल
By admin | Published: March 26, 2016 12:29 AM2016-03-26T00:29:55+5:302016-03-26T00:29:55+5:30
रुग्णालयातील रुग्णांना चांगली सेवा, उत्तम वागणूक, औषधी, वेळेवर उपचार करण्यासाठी तत्पर असलेल्या येथील ..
निवड : आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानित
तुमसर : रुग्णालयातील रुग्णांना चांगली सेवा, उत्तम वागणूक, औषधी, वेळेवर उपचार करण्यासाठी तत्पर असलेल्या येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयाला भंडारा जिल्ह्यात प्रथम स्थान प्राप्त झाले आहे. या रुग्णालयाला आनंदीबाई जोशी पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णालयाची तपासणी केल्यानंतर सर्वाेत्कृष्ठ सेवा ही तुमसरच्या रुग्णालयात पाहायला मिळण्याने निरीक्षण करणाऱ्या चमूने संपूर्ण जिल्ह्यात अव्वल स्थान तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयाला दिले. जिल्ह्यात सर्वाेत्कृष्ठ सेवा देणारा रुग्णालय म्हणून तुमसरची निवड करण्यात आल्याने भंडारा येथे आयोजित महाआरोग्य मेळाव्यात डीएमओ, डॉ. देवेंद्र पातुरकर, निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित तुमसर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळबुद्धे यांना प्रशस्तीपत्र, सन्मानपत्र व रोख ५० हजार रूपयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार या अगोदर २००७ ला तुमसर रुग्णालयाला राज्यात पहिला क्रमांकाचा मानकरी ठरले होते. २००६ ला दुसरा क्रमांक व त्यानंतर तब्ब्ल १० वर्षानंतर डॉ. बाळबुद्धे यांच्या नेतृत्वात या उपजिल्हा रुग्णालयाला आनंदीबाई जोशी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)