अवकाळी पावसाने झोडपले

By admin | Published: December 22, 2015 12:36 AM2015-12-22T00:36:00+5:302015-12-22T00:36:00+5:30

सोमवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अर्धा तासानंतर पुन्हा पाऊस बरसल्यामुळे ...

Suddenly the rain rained | अवकाळी पावसाने झोडपले

अवकाळी पावसाने झोडपले

Next

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट : कोरडवाहूसाठी फायदेशीर, ओलिताचे होणार नुकसान
भंडारा : सोमवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अर्धा तासानंतर पुन्हा पाऊस बरसल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. हा पाऊस कोरडवाहू शेतीसाठी लाभदायी असला तरी ओलिताखाली असलेल्या शेतीला नुकसानदायी ठरला आहे.
दिवसभर उन्ह-सावल्यांचा खेळ सुरु होता. अचानक सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसापासून बचावासाठी अनेकांना मिळेल त्या ठिकाणी आडोसा घ्यावा लागला. त्यानंतर ७ वाजताच्या सुमारास काहीवेळ वीज पुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. खरीप हंगाम असमाधानकारक असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे भंडारा परिसरात अकाली पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. लाखनी, भंडारा, मोहाडी परिसरात पावसाने हजेरी लावली. पवनी तालुक्यातील अड्याळ व लाखांदूर तालुक्यातील मासळ परिसरात ढगाळ वातावरण होते. परंतु पाऊस बरसला नाही. कडधान्यांसह पऱ्हे टाकलेल्या रबी धानपिकांसाठी हा पाऊस नुकसानदायक ठरला. कडधान्यांवर किडीच्या प्रादुर्भाव वाढला आहे. चौरास भागात हरभरा, मूग, तूर, लाखोळी, गहू, पोपट, जवस आदी कडधान्ये लावली आहेत. सोबतच रबी धानाच्या पऱ्हे पेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसासह ढगाळ वातावरण असल्याने हरभरा, मूग, तूर, लाखोळी, गहू, पोपट, जवस आदी कडधान्यांवर कीडींनी आक्रमण केले आहे. तुरींवर अळी वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी धान खरेदी केंद्रांच्या आवारात धानाची पोती उघड्यावर असल्यामुळे या धानाला पावसाचा फटका बसला आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेचा सामना मात्र करावा लागत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Suddenly the rain rained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.