अवकाळी पावसाचा रबीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:08 PM2019-01-25T23:08:42+5:302019-01-25T23:09:07+5:30

जिल्ह्यात गुरूवारपासून हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच धान खरेदी केंद्रात पोत्यांमध्ये भरून ेठेवलेले शेकडो क्विंटल धान ओले झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. दुसरीकडे या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

Suddenly rain rains | अवकाळी पावसाचा रबीला फटका

अवकाळी पावसाचा रबीला फटका

Next
ठळक मुद्देशेकडो क्विंटल धान पाण्यात : शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गुरूवारपासून हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच धान खरेदी केंद्रात पोत्यांमध्ये भरून ेठेवलेले शेकडो क्विंटल धान ओले झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. दुसरीकडे या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरीत गुरूवारपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मोहाडीत गारपिटीसह पाऊसही बरसला. या पावसामुळे गहू, हरभरा, उळीद, मुंग, लाखोरी यासह भाजीपाला पिकांची चांगलीच नासाडी झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.
आसगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, अवकाली पावसामुळे आसगाव परिसरातील भाजीपाला पिकासह फळबागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. चना, वटाना, जवस, लाख, लाखोरी, पोपट या फुलवर्गीय पिकांना या अकाली पावसाचा जास्त फटका बसला आहे. जमीनित ओलावा वाढल्यामुळे काळणीयोग्य झालेल्या शेंगा काळ्या पडल्यामुळे गुरांचा चारासुद्धा महागण्याची शक्यता आहे.
मासळ येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्यासुमारास मासळ परिसरात पाऊस बरसला. यात ढगाळ वातावरणामुळे रबी हंगामातील पिकांना याचा फटका बसला आहे. परिणामी खरीपाचे उत्पादन समाधानकारक नसताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकºयांची चिंता वाढविली आहे.
साकोली येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात मागील २४ तासात वादळी पावसाने हजेरी लावली.
गुरूवार दुपारपासून ढगाळ वातावरण असल्याने याचा पिकांवरही परिणाम जाणवला. गहू, हरभरा, भाजीपाला पिकांसह अन्य पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.
६.२ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी एकूण ६.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. सर्वच तालुक्यात या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येते. शेतकºयांनी मदतीची मागणी केली आहे.

Web Title: Suddenly rain rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.