अवकाळी पावसाचा गहू, हरभरा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 09:58 PM2018-03-16T21:58:23+5:302018-03-16T21:58:23+5:30

गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळच्या सुमारास भंडारा शहरात रिमझिम पाऊस बरसला. त्यानंतर वातावरणात दिवसभर गारवा होता.

Suddenly rainy wheat, gram grains hit | अवकाळी पावसाचा गहू, हरभरा पिकांना फटका

अवकाळी पावसाचा गहू, हरभरा पिकांना फटका

Next
ठळक मुद्देउत्पादनात तूट येण्याची शक्यता : कापणी केलेले रबीचे पीक संकटात, मळणीचे काम थांबविले

आॅनलाईन लोकमत
भंडारा : गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळच्या सुमारास भंडारा शहरात रिमझिम पाऊस बरसला. त्यानंतर वातावरणात दिवसभर गारवा होता. या पावसामुळे हरभरा व गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतात उभ्या पिकासह कापणी झालेल्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
साकोली : मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व सकाळपासूनच अवकाळी पावसाने सुरूवात केली. वातावरणातील अनियमिततेमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दरवर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी गहू, चना, लाखोरी, उळीद, मुंग पिकांची लागवड केली. मात्र कापणीच्या वेळेवर पाऊस आल्याने शेतकºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पवनी : शेतात उभ्या पिकासह कापणी झालेल्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. खरीप हंगामात शेतकºयांनी गहु, चना, उडीद, मुंग, हरभरा, बाजरी, वाटाना यासारख्या अन्य पिकांची लागवड केली होती. पेरणीच्या सुरूवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले होती. पिक हातात आल्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आता हातात आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
लाखांदूर : चौरास भाग म्हणून ओळखल्या जाणाºया मोहरणा, खैरणा, डांभेविरली, विहीरगाव, खैरीपट, गवराळा, दोनाड, नांदेड, किरमटी, रोहणी, किरमटी परिसरातील शेतकºयांना अवकाली पावसाचा फटका बसला असून, कडधान्याची पिके पाण्याखाली सापडली आहेत.
मोहाडी/ जांब : धान पिकाची रब्बी पिकामध्ये निघेल या आशेने शेतकºयांनी रब्बी पिकाची लागवड केली, परंतु तोंडावर आलेला रब्बी पिकाचे वादळी पावसाने नुकसान केली तरी शेतकºयांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.
पालांदूर : फेब्रुवारीत अवकाळी पावसाने हजेरी लावत कडधान्याचे नुकसान केले तर काही ठिकाणी भाजीपाल्याचे नुकसान झाले होते. शुक्रवारच्या अवकाळी पावसाने गहू कापणी प्रभावित झाली असून हंगाम हप्ताभर पुढे ढकलला जाऊ शकतो. पावसामुळे हवेत गारवा असून तापमानात घसरले आहे. पालांदूर परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याने व्यापाºयांवर रिकामे राहण्याची वेळ आली. वातावरण आणखी किती दिवस असे राहील याची शेतकºयांना चिंता सतावू लागली आहे.
आसगाव : शुक्रवारला सकाळपासून कुठे रिमझिम तर कुठे जोराच्या पावसामुळे शेतातील चुरणे, रब्बी पिकाची कापणी थांबविले. शेतामध्ये वाटाणा, गहू, चना, लाख, उळीद, मूग, जवस ही उभे पिके आहेत. या पिकांच्या कापणी केलेल्या कळपा शेतात पडल्या असून या पावसामुळे असेच वातावरण राहिले पिकाचे दाणे काळे पडून गुरांचा चारासुद्धा काळा पळणार आहे. या पावसाचा फटका गहू पिकाला बसणार आहे.
 

Web Title: Suddenly rainy wheat, gram grains hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.