हक्काचा प्लाॅट मिळाल्याने सुग्रताबाईचा आनंद गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:38 AM2021-09-25T04:38:47+5:302021-09-25T04:38:47+5:30
भंडारा तालुक्यातील पिंडकेपार येथील सुग्रताबाई उर्फ सुंदराबाई या रहिवासी. गावातच बालपण गेले आणि गावातीलच पंचम मतेसाेबत विवाह झाला. परंतु ...
भंडारा तालुक्यातील पिंडकेपार येथील सुग्रताबाई उर्फ सुंदराबाई या रहिवासी. गावातच बालपण गेले आणि गावातीलच पंचम मतेसाेबत विवाह झाला. परंतु लग्नानंतर काहीकाळातच सुग्रताबाईला पतीने वाऱ्यावर साेडून दिले. एक मुलगा व एका मुलीसाेबत ती राहू लागली. सर्वांच्या जबाबदाऱ्या तिने पार पाडल्या. संघर्षमय जीव जगताना त्यांचे पिंडकेपार प्रकल्पबाधित झाले. सर्वांना बेला येथे प्लाॅट मिळाले. परंतु सुग्रताबाईचे नाव त्या यादीतच नव्हते. गावातील अंतर्गत राजकारणामुळे सुग्रताबाई पिंडकेपारची रहिवासी नाही असे शासनदरबारी सांगितले आणि ती हक्काच्या प्लाॅटपासून वंचित झाली.
गत काही वर्षांपासून आपल्या नातवाला साेबत घेऊन ती जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित हाेती. २०१७ पासून त्यांनी अनेक पत्र पुनर्वसन विभागाला दिले. त्यावेळी त्यांना रहिवासी असल्याचे ठाेस पुरावे सादर करण्याचे फरमान काढले. मात्र त्यांच्याजवळ असा काेणताच कागद नव्हता. त्यामुळे हक्काचा प्लाॅट मिळणार की नाही अशी शंका हाेती.
अशातच कुणीतरी आजीबाईंना राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत साेनकुसरे यांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यांना आपली पूर्ण कहानी सांगितली. त्यावर मदत करण्याचे आश्वासन दिले. मेहनत घेऊन सर्व कागदपत्र जमा करण्यात आले. सर्व पुरावे पुनर्वसन विभागाला दिले. सातत्यपूर्ण पाठपुराव्याने अखेर गत आठवड्यात सहा हजार चाै. फुटाचा प्लाॅट सुग्रताबाईला मिळाला. पाच वर्षांपासूनचा संघर्ष फळाला आला.
बाॅक्स
कागदपत्रांसाठी अशा करावा लागला संघर्ष
सुग्रताबाईला आपण गावचे रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी माेठी दमछाक करावी लागली. यशवंत साेनकुसरे यांच्या मदतीने त्यांनी सर्व कागदपत्र मिळविले. २००७ची पिंडकेपारची मतदार यादी मिळविली. पुनर्वसनाचे सर्वेक्षणही त्याच काळात झाले हाेते. त्याची मुळ यादी मिळविण्यात आली. दारिद्र्य रेषेखाली सर्वेक्षणातही त्यांचे नाव हाेते. ती भंडारा पंचायत समितीतून यादी मिळविण्यात आली . सर्व यादीमध्ये त्यांचे नाव हाेते. परंतु गावातील राजकारणात त्यांना बेदखल व्हावे लागले हाेते. अखेर एक एक कागद गाेळा करून प्रशासनाला यशवंत साेनकुसरे यांनी सादर केले. त्यानंतर ईश्वरचिठ्ठीने सुग्रताबाईला प्लाॅट मिळाला.
काेट
गाेसे प्रकल्पग्रस्तांचा अनेक समस्या आहेत. स्थानिक राजकारणही आडवे येते. त्यामुळेच सुग्रताबाई प्लाॅटपासून बेदखल झाल्या हाेत्या. मात्र त्यांचे रहिवासीचे पुरावे गाेळा केले. आता त्यांना हक्काचा प्लाॅट मिळाला.
-यशवंत साेनकुसरे,
अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस