आजाराला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:23 PM2018-07-14T22:23:09+5:302018-07-14T22:23:28+5:30

मानसिक आजाराच्या त्रासाला कंटाळून परसोडी (ठाणा) येथील रहिवासी प्रभाकर रामचंद्र गायधने यांनी शनिवार रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

Suicide bored of illness | आजाराला कंटाळून आत्महत्या

आजाराला कंटाळून आत्महत्या

Next
ठळक मुद्देपरसोडी (ठाणा) येथील घटना : कुटुंबावर शोककळा

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : मानसिक आजाराच्या त्रासाला कंटाळून परसोडी (ठाणा) येथील रहिवासी प्रभाकर रामचंद्र गायधने यांनी शनिवार रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
याबाबत असे की, परसोडी ठाणा येथील रहिवासी प्रभाकर उर्फ भेदीलाल रामचंद्र गायधने (३५) हा आपल्या पत्नी गीता गायधने सोबत भाजी विक्रीचा व्यवसाय करीत होते. व्यसनाच्या आहारी गेलेल्या पती भेदीलालचा पत्नी गीता हिने परमात्मा एक सेवक हा मार्ग स्वीकारल्याने व्यसन सुटले या आशेने मार्ग स्वीकारला. दोन महिन्यापासून व्यसन सुटले. कालांतराने पूर्वी असलेला आजर वाढत गेला. डोक्यावर अधीक परिणाम झाला. अचानक आज शनिवारी सकाळी ६.३० वाजता सुमारास ठाणा टी पॉइंट चौकातून फिरून येतो म्हणून पत्नी गितास सांगितले. ७.३० वाजले पती भेदीलाल घरी परत आलेला नाही. परिणामी पती शोधाशोध सुरु केले. घरातील लहान भावाला मानव मंदिर परसोडी परिसरात आढळला. घरी परत येणार या आशेने लक्ष दिले नाही. घरी पोहचला नाही म्हणून पुन्हा मानव मंदिर परिसर पिंजून काढले. विहिरी व अन्य ठिकाण शोधले. आढळला नाही. दरम्यान ओम सत्यसाई महाविद्यालय परसोडी ठाणा परिसरातील एका इसमाला स्मशानभूमी परिसरातील विहिरीत एक इसम पडल्याची खबर वाऱ्यासारखी गावात पसरली. पुन्हा त्याच परिसरात विहिरीत गार एकूण पहाले असता सदर इसमाने म्हणजे प्रभाकर उर्फ भेदीलाल गायधने स्वत: आत्महत्या केल्याचे उघड सकाळी ८.३० वाजता सुमारास झाली. भेदीलाल यांना १३ वर्षीय एक मुलगी व ६ व्या वर्गात शिकत असलेला ११ वर्षीय मुलगा व पत्नी गीता असा आप्तपरिवार आहे. घटनेची माहिती पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे सांगितले असता चौकशीकरिता तब्बल दीड तास उशिरा म्हणजे १० वाजता बिट जमादार पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन करीत भंडारा रुग्णालयात पाठविण्यात आले. हेमराज गायधने (३२) यांच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस हवालदार नत्थू सार्वे व पोलीस नायक प्रफुल्ल वालदे करीत आहे.

Web Title: Suicide bored of illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.