दहा महिन्यात १६ शेतकºयांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 09:51 PM2017-11-09T21:51:49+5:302017-11-09T21:52:04+5:30

काळया मातीसह निर्सगानेही साथ दिली नाही. अशात कर्जबाजारीपणा व चिंतेने ग्रासून मागील दहा महिन्यात जिल्ह्यातील १६ शेतकºयांनी आत्महत्या केली.

 Suicides of 16 farmers in ten months | दहा महिन्यात १६ शेतकºयांच्या आत्महत्या

दहा महिन्यात १६ शेतकºयांच्या आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देसातबाराची अडचण कायम : मदतीची पाच प्रकरणे निकाली

इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काळया मातीसह निर्सगानेही साथ दिली नाही. अशात कर्जबाजारीपणा व चिंतेने ग्रासून मागील दहा महिन्यात जिल्ह्यातील १६ शेतकºयांनी आत्महत्या केली. उल्लेखनीय म्हणजे यातील मृत पावलेल्या फक्त पाच शेतकºयांच्या कुटुंबाला एक लाखांची शासकीय मदत मिळाली आहे. नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जीव गेल्यास चार लाखांची मदत मिळते, परंतु जगाच्या पोशिंदाच्या कुटुंबाला एक लाखांची तोकडी मदत दिली जाते.
शेतकºयांच्या आत्महत्येच्या आकडेवारीवर नजर घातल्यास जिल्ह्यात मागील १४ वर्षात एकूण ४८४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.
यात सर्वात जास्त आत्महत्या सन २००८ मध्ये झाल्या. यात ६१ शेतकºयांनी विविध कारणांनी जगाचा निरोप घेतला. मात्र तिथेही शासन- प्रशासन मागे राहिले नाही. ६१ पैकी फक्त १२ शेतकरी कुटुंबियांना मदत देण्यात आली. मृत पावलेल्या शेतकºयाचे नाव सातबारावर नसणे, ही मुख्य बाब आर्थिक मदतीच्या आड आली आहे. त्यातही अन्य तांत्रिक अडचणींमुळे मृत पावलेल्या शेतकरी कुटुंबियातील नागरिाकांना अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही.
१४ वर्षात ४८४ आत्महत्या
जिल्ह्यात सन २००३ ते २०१७ या कालावधीत एकुण ४८४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात वर्षनिहाय अंतर्गत २००३ मध्ये ३, २००४ मध्ये ७, २००५ मध्ये १२, २००६ मध्ये ५१, २००७ मध्ये ५०, २००८ मध्ये ६१, २००९ मध्ये ३०, २०१० मध्ये ३१, २०११ मध्ये ४४, २०१२ मध्ये १८, २०१३ मध्ये १५, २०१४ मध्ये ३६, २०१५ मध्ये ५६ तर २०१६ मध्ये ५४ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. यात एकुण ४६८ शेतकरी आत्महत्येपैकी फक्त १९६ शेतकरी कुटुंबांना शासनाकडून मदत मिळाली.
या कुटुंबांना मिळाली मदत
यावर्षी जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत १६ शेतकºयांनी आत्महत्या केली. यात विलास शंकर मारवाडे रा. बेटाळा (मोहाडी), रविंद्र ब्राम्हणकर रा. विरली(पवनी), प्रेमदास गणपत घरत रा. तिर्री(पवनी), ईश्वर तुळशीराम मदनकर रा. खोलमारा(लाखांदूर), बापू डोमा बोरकुटे रा.चोवा (भंडारा) असे मृत पावलेल्या शेतकºयांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक लाखाची मदत देण्यात आली आहे. उर्वरित असलेल्या ११ प्रकरणांवर निर्णय झाला नसल्याची बाब समोर आली आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या नियमांतर्गत मृत पावलेल्या शेतकरी कुटुुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपयाप्रमाणे मदत देण्यात आली आहे. यावर्षी एकूण ५ प्रकरणे निकाली काढून मदत देण्यात आली.
-अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा.

Web Title:  Suicides of 16 farmers in ten months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.