सुकन्यांना मिळणार समृद्धीचे बळ

By admin | Published: January 5, 2016 12:33 AM2016-01-05T00:33:32+5:302016-01-05T00:33:32+5:30

मुलींच्या घटत्या जन्मदराची चिंता सतावत असताना त्यांच्या उत्कर्षासाठी काढण्यात आलेल्या सुकन्या योजनेला जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Sukanya will get prosperity | सुकन्यांना मिळणार समृद्धीचे बळ

सुकन्यांना मिळणार समृद्धीचे बळ

Next

मुलींच्या भविष्यासाठी पालक सरसावले : जिल्ह्यात सुकन्या योजनेचे ९,२०० लाभार्थी
इंद्रपाल कटकवार भंडारा
मुलींच्या घटत्या जन्मदराची चिंता सतावत असताना त्यांच्या उत्कर्षासाठी काढण्यात आलेल्या सुकन्या योजनेला जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, मुलगी संस्कृतीची आधारशिला असून जननी आहे, या दृष्टीकोणातून शासनाने सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी पालकही सरसावले आहेत. जिल्ह्यात या योजनेअंतर्गत गत दहा महिन्यात ९ हजार २०० खाती डाक विभागात उघडण्यात आली आहेत.
जिल्ह्यात डाकघरांची एकुण संख्या १३९ असून त्यात १२१ ग्रामीण डाकघर असून १८ उपडाकघर आहेत. या सर्व डाकघरांमार्फत सुकन्या समृद्धी योजना राबविली जात असून जिथे मुलगी आहे तिथे आनंद आहे. असे ब्रिदवाक्य सांगून या योजनेचे उद्दीष्ट्य पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरु आहे.

अशी आहेत उद्दिष्ट्ये
० ते दहा वर्ष वयोगटातील मुलींची खाती या योजनेअंतर्गत उघडता येते. दांपत्याला दोन मुलींपर्यंत या योजनेत भाग घेता येऊ शकते. कमीत कमी १००० रुपये व अधिकाधिक दीड लक्ष रुपये एका वित्तीय वर्षात मुलीच्या खात्यामध्ये जमा करता येऊ शकते. यावर शासनाकडून ९.२ टक्के दराने व्याज दिले जाते. खातेधारकाची किंवा मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षण किंवा विवाहप्रसंगी खर्चाची पूर्तता पूर्ण करण्यासाठी पूर्ण रकमेपैकी ५० टक्के रक्कम काढता येते. २१ वर्षे वय पूर्ण झाल्यावर खाते परिपक्व झाले असे नमूद आहे.
विशेष म्हणजे सदर खाते भारतात कुठेही एका डाकघरातून दुसऱ्या डाकघरात स्थानांतरीत करण्यात येते. या योजनेत पालकाला समाविष्ठ होण्यासाठी कुठलीही अट ठेवण्यात आली नाही.
या योजनेत दीड लक्ष रुपयापर्यंतच्या अंतर्गत प्राप्तीकर सुट देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत समाविष्ट लाभार्थ्यांला मदत एकाच टप्प्यात मिळणार असल्याने विकासाचे पर्यायाने समृद्धीचे बळ मिळेल.

डाक विभागामार्फत सुकन्या समृद्धी खाते योजना राबविली जात आहे. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. जेणेकरून त्यांच्या मुलींचे भविष्य सुखकर होऊ शकेल.
-अविनाश अवचट
मुख्य पोष्टमास्तर, प्रधान डाकघर भंडारा.

Web Title: Sukanya will get prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.