सुखदेवे विद्यालय फुलमोगरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:42 AM2021-09-08T04:42:14+5:302021-09-08T04:42:14+5:30
भंडारा : तालुक्यातील अशोकनगर (फुलमोगरा) येथील माणिकराव सुखदेवे विद्यालय येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक ...
भंडारा : तालुक्यातील अशोकनगर (फुलमोगरा) येथील माणिकराव सुखदेवे विद्यालय येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील घोल्लर होते. यामध्ये विद्यार्थ्यांकरिता स्वयंशासन उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना एक दिवस शाळा चालविण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी ते कार्य उत्तमरित्या पार पाडले. मुख्याध्यापक म्हणून श्रावणी गणवीर हिने कार्य उत्तमरित्या कार्य पार पाडले. तर उपमुख्याध्यापक म्हणून दिशा वक्कलकार व वंश लेंडे याने पार पाडले. आदेश सपाटे, रूनमय कढव, सक्षम वासनिक यांनी कार्य पार पाडले. विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून उत्कृष्टरित्या कार्य केले. त्यामध्ये माध्यमिक विभागातून जितेंद्र बोधनकर प्रथम क्रमांक, श्रावणी गणवीर द्वितीय क्रमांक, दिशा वक्कलकार हिने तृतीय क्रमांक पटकावला. उच्च प्राथमिक विभागातून आदर्श कढव प्रथम, प्रियांशी कवाडे द्वितीय, सौम्य घोल्लर याने तृतीय क्रमांक पटकावला. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव अनंत डुम्भरे, प्रकाश चौधरी, गजानन लिचडे, ईश्वर दास लाखडे, श्रावण चव्हाण, प्रतिभा जिभकाटे, अनुराधा हुमने, जयश्री घोल्लर, चंद्रशेखर डुम्भरे, राजेश मेश्राम, देवा वाट, धनंजय सेलोकर आदींनी सहकार्य केले.