उन्हाळी धानाची रोवणी धडाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:32 AM2021-01-18T04:32:04+5:302021-01-18T04:32:04+5:30
विजेचा वेळापत्रक दिवस रात्रीचा ठरलेला आहे. रात्रीच्या वेळापत्रकात रोवणीचे प्रमाण कमी असते. दिवसाला मिळणाऱ्या विजेच्या वेळात रोवणी बऱ्यापैकी केली ...
विजेचा वेळापत्रक दिवस रात्रीचा ठरलेला आहे. रात्रीच्या वेळापत्रकात रोवणीचे प्रमाण कमी असते. दिवसाला मिळणाऱ्या विजेच्या वेळात रोवणी बऱ्यापैकी केली जाते. आठ तास वीजपुरवठा मिळत आहे. रात्रकालीन वीजपुरवठा कमी करून दिवसाला किमान दहा तास तरी वीज मिळावी, अशी अपेक्षा आहे. इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या डोईजड होत आहे. शासनाने लक्ष पुरवीत निदान शेतकऱ्यांना तरी अनुदानावर इंधनाची सोय करावी.
चुलबंद खोऱ्यातील वाकल, ढिवरखेडा, मऱ्हेगाव, पाथरी ,नरव्हा ,लोहारा , खराशी, खुणारी, पालांदूर आधी ठिकाणी रोहिणी सुरू झालेली आहे. ग्रामीण भागात कडधान्य काढनी व रोवनी एकाच वेळेस येत असल्याने काही प्रमाणात मजूर टंचाईचा सामना शेतकरीवर्गाला करावा लागतो.
ठोकड धानाच्या वानाची लागवड अधिक प्रमाणात असून, फाइन व्हरायटीचे अत्यल्प प्रमाणात दिसत आहे. उन्हाळी हंगामाच्या धानाला बोनस राहत नसल्याने काही अभ्यासू शेतकरी फाइन व्हरायटी निवडतात. सर्वसाधारण व्हरायटीपेक्षा फाइन व्हरायटीला प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपये हंगामाचा अंदाज पाहून मिळतात. नफा-तोटा याचा विचार करणारे शेतकरी उन्हाळी हंगामात थोड्याफार प्रमाणात का होईना फाइन व्हरायटी लावतात. आधारभूत धान केंद्रावर धान विक्री करताना प्रति एकर केवळ १४ क्विंटल धान मोजण्याची मुभा असते. उन्हाळी हंगामात उत्पन्नात प्रति एकर २० ते २५ क्विंटल उत्पन्न शक्य असते. अशावेळी आधारभूत केंद्रावर धान विक्री करताना सातबाराची समस्या उभी राहते. त्यामुळे ठोकळ धानाला पर्याय फाइन व्हरायटी लावले जाते. बरेच शेतकरी फाइन व्हरायटी ऑगस्ट महिन्यापर्यंत घरीच भरून ठेवतात. पोळा सणानंतर अधिक भाव मिळत असल्याने साठवणूक करून ठेवतात. भाव वाढल्यास दोन पैसे अधिक मिळतात.
चूलबंद खोऱ्यात ट्रॅक्टर, मजूर, कृषी केंद्र धारक उन्हाळी हंगामात सक्रिय झालेले आहेत. खताच्या रॅकसुद्धा उतरल्या असून, कृषी केंद्रापर्यंत ट्रकच्या माध्यमातून खत आलेली आहेत.
पावसाळी हंगामापेक्षा या हंगामात खताचे दर कमी झालेली आहेत. उन्हाळी हंगामात खर्चात बचत होत असून उत्पन्नात वाढ होत असल्याने चूलबंद खोऱ्यात उन्हाळी हंगाम धानाकरिता सरसावलेला आहे.
डिसेंबर महिन्याच्या मध्यर्थात नर्सरी घातली होती. महिनाभराच्या अंतराने हिरवेगार पऱ्हे योग्य झाले आहेत. उद्यापासून हुंडा पद्धत मजुरांच्या आधाराने रोवणीचा श्री गणेशा सुरू होत आहे. दिवसाला मिळणारी आठ तासांची वीज किमान दहा तास तरी असावी. इंधन दरवाढ शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. किमान शेतकऱ्यांना तरी अनुदानावर इंधन पुरवठा करावा.
कृष्णा पराते शेतकरी पालांदूर