सात हजार हेक्टर क्षेत्रात होणार उन्हाळी धानाची रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:07 AM2021-03-04T05:07:32+5:302021-03-04T05:07:32+5:30

गत खरीप हंगामात तालुक्यातील जवळपास २८ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र तीनदा निर्माण झालेली ...

Summer grain planting will be done in an area of 7,000 hectares | सात हजार हेक्टर क्षेत्रात होणार उन्हाळी धानाची रोवणी

सात हजार हेक्टर क्षेत्रात होणार उन्हाळी धानाची रोवणी

Next

गत खरीप हंगामात तालुक्यातील जवळपास २८ हजार हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र तीनदा निर्माण झालेली पूर परिस्थिती, तुडतुडा व अन्य कीडरोगासह परतीच्या पावसाने लागवडीखालील पिकाचे प्रचंड नुकसान होऊन उत्पादनात घट झाली आहे. आता यंदाच्या रब्बी हंगामात लाखांदूर तालुक्यात बाघ, इटियाडोह धरण लाभक्षेत्र व कृषी पंपाच्या साहाय्याने सिंचन करुन जवळपास सहा हजार९५० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान नर्सरी लावण्यात आली आहे. लागवडींतर्गत तालुक्यातील जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धान पिकाची रोवणी अपेक्षित आहे. आतापर्यंत तीन हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची रोवणी पूर्ण झाली आहे.

खरीपातील नुकसान भरपाई काढण्यासाठी रब्बी हंगामात उन्हाळी धानासह अन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे.

Web Title: Summer grain planting will be done in an area of 7,000 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.