सनफ्लॅग व्यवस्थापनाची अरेरावी कायम, कामगारांचा संप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:36 AM2021-03-17T04:36:13+5:302021-03-17T04:36:13+5:30

तथागत मेश्राम वरठी : सनफ्लॅग कामगार संघटना यांनी उभारलेला लढ्याला चार दिवस झाले. चार दिवसापासून शेकडो कामगार उपाशी-तापाशी उघड्यावर ...

Sunflag management's arrears continue, workers' strike continues | सनफ्लॅग व्यवस्थापनाची अरेरावी कायम, कामगारांचा संप सुरूच

सनफ्लॅग व्यवस्थापनाची अरेरावी कायम, कामगारांचा संप सुरूच

Next

तथागत मेश्राम

वरठी : सनफ्लॅग कामगार संघटना यांनी उभारलेला लढ्याला चार दिवस झाले. चार दिवसापासून शेकडो कामगार उपाशी-तापाशी उघड्यावर आहेत. दरम्यान जिल्ह्यातील दोन आमदार व खासदार यांनी तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. पण सनफ्लॅग व्यवस्थापन तडजोड करायला तयार नाही. आमदार- खासदार यांनी घेतलेल्या बैठकीत व्यवस्थापनाने काडीची किंमत दिली नाही बैठकीदरम्यान त्यांना प्रतिक्षालयाच्या दालनात बसवले. अरेरावी कायम ठेवून लोकप्रतिनिधींसह कामगार नेत्यांना उलट पाऊली परतवले. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अस्तित्वावर गावात जोरदार रंगत आहेत. यापूर्वी कामगाराच्या समस्या नागपुरातून सोडवण्यात आल्या. यावेळी निर्णय नागपूरच्या दिशेने आहे. नागपुरातील अस्तित्व कुणाच्या प्रतीक्षेत आहे अजून समजत नाही. जिल्ह्याचे अस्तित्व कमी करून स्थानिक लोकप्रतिनिधींना जागा दाखवायचे कारस्थान दिसत आहे.

भंडारा जिल्हा राजकीय वजनाने माघारलेला जिल्हा म्हणून ओळख आहे. राष्ट्रीय व राज्य पातळीवर वजन राखणारे लोकप्रतिनिधी म्हणून वावरणारे काही नाव असले तरी प्रत्येक्षात त्यांना किंमत नसल्याचे दिसते. जिल्ह्यात उद्योग धंद्याचा वानवा आहे. बोटावर मोजता येतील एवढेच उद्योग सुरु आहेत.

निवडणुकीपूर्वी काही घोषणा झाल्यात पण निकालापडल्या नंतर कंपन्या बंद पडल्या. जे सुरु आहेत त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींचा प्रभाव नाही. लोकप्रतिधींना हीन वागणूक देण्यात सनफ्लॅग व्यवस्थापन अग्रेसर आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाणउतारा करण्यात सनफ्लॅग व्यवस्थापन पटाईत आहे. याचे अनेक उदाहरण स्थानिक नागरिकांनी अनुभवले आहेत. लहान लहान प्रकरणी उग्ररूप धारण करणारे लोकप्रतिनिधी सनफ्लॅग व्यवस्थापन समोर नांगी का टाकतात अजून समजण्यापलीकडे आहे. आत काहीतरी दडलंय अशी चर्चा गावात सुरु आहेत. १३ मार्च पासून सनफ्लॅग कामगार संघटनांनी विविध मागण्यासाठी संप पुकारले. संप पुकारण्यापूर्वी आवश्यक सर्व लेखी सूचना कामगार संघटना यांनी सनफ्लॅग व्यवस्थापन व कामगार आयुक्त यांच्यासह स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी दिल्या. मागण्या एकदम शुल्लक आणि हक्काच्या आहेत. कामगार संघटनांनी पुढे केलेल्या सर्व मागण्या जुन्याच आहेत. तीस वर्षांपासून सुरु असलेला त्रैवार्षिक करार, दिवाळीचा बोनस यासह कंत्राटी कामगारांना किमान वेतन व भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ आणि अनुभवानुसार स्थायी कामगार बनवणे.

यात एकही मागणी नवीन नाही. सनफ्लॅग व्यवस्थापन व कंपनी नुकसानीत नाही. कोविडच्या प्रभावतातही सनफ्लॅग कंपनीने मोठा कमावला. हा नफा कामगाराच्या घामाचे आहे. कामगाराच्या घामाचे दाम देण्यास मात्र सनफ्लॅग व्यवस्थापन नाकारत आहे. सध्या संपाची धग शांत आहे. पण व्यवस्थापन संपला चिघळण्याचे पूर्ण प्रयत्नात असल्याने तूर्तास यावर तोडगा न निघाल्यास संप पेटण्याची शक्यता आहे.

बोलता धनी दुसरा

संपाच्या पहिल्या दिवसापासून कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात चर्चा झाली. यासाठी आमदार राजू कारेमोरे व खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेतला. सनफ्लॅग व्यवस्थापना कडून रामचंद्र दळवी व सतीश श्रीवास्तव बैठकीला उपस्थित होते. दळवी यांनी दोन्ही बैठकीत अरेरावीची भाषा वापरली. कामगाराच्या मागण्यांवर एकशब्द न बोलता कंपनी बंद करा आम्हाला फरक पडत नाही असे सूतोवाच केले. त्यांच्या अरेरावी भाष्याच्या मागे बोलता धनी दुसराच आहे. सॅनफ्लॅग चे सर्वेसर्वा नागपुरात आहेत. बैठकीला येणारे अधिकारी हे बोथड अभिवाचनाचे धनी आहेत. त्यांना कामगाराच्या समस्यांची जाण असल्याचे झळकते पण अधिकार शून्य माणसांना बैठकीला पाठवून सनफ्लॅग व्यवस्थापन चिडवण्याचे काम करीत आहे.

बॉक्स

तर कानशिलात वाजवणार - नरेंद्र भोंडेकर

कामगारांच्या मागण्या बाबतीत व्यवस्थापन उदासीन आहे. कामगारांच्या मागण्या सरळ मार्गाने व लवकर न सुटल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनात उतरू आणि वेळ पडली तर कानशिलात वाजवू असा इशारा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला. मी कामगारांच्या सोबत असून सध्या मी यात शांत व संयमी भूमिका घेऊन समस्या सुटण्याची वाट पाहतो. पण सनफ्लॅग व्यवस्थापन याची दखल घेत नसेल तर मी रस्त्यावर उतरणार अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. कामगारांनी आपले शर्तीचे प्रयत्न करावे. आपल्या मागण्या लोकशाही मार्गाने प्रयत्न करून सोडवावे. यावर व्यवस्थापन ऐकत नसेल तर दुसऱ्या दिवशी संपाची धुरा आपल्या हाती घेऊन आपल्या स्टाईलने प्रश्न मार्गी लावणार असे आश्वसन त्यांनी कामगारांना दिले.

तोंडाचे पाणी सुकले

कामगाराच्या संपाला सनफ्लॅग व्यवस्थापन धक्क्यावर धक्के देत आहे. अधिकार नसलेले अधिकारी बैठकीला पाठवून संप चिघळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. तरी संपाचा जोश कमी होताना दिसत नाही. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यात कामगारांचे तोंडाचे पाणी सुकले असले तरी कामगार उत्साह व मागण्या पूर्ण होण्याच्या आशा झळकतात आहेत. कंपनी बंद असली तरी कंपनी पासून काही अंतरावर ठिकठिकाणी कामगार तंबू टाकून दिवस रात्र जागत आहेत. चार दिवसापासून कामगार उघड्यावर बसून आहेत. कामगार संघटनेच्या कार्यालयात मनोरंजन म्ह्णून गाणे गाऊन दिवस काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Web Title: Sunflag management's arrears continue, workers' strike continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.