बॅन्ड स्पर्धेत सनफ्लॅग स्कूल राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:25 PM2017-11-23T23:25:48+5:302017-11-23T23:26:01+5:30
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व उपसंचालक क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बॅन्ड स्पर्धेत भंडारा येथील...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व उपसंचालक क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बॅन्ड स्पर्धेत भंडारा येथील सनफ्लॅग स्कूलच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे.
विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे उपसंचालक राजकुमार माहादावाड व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.उर्मिला मोराळे यांच्या उपस्थितीत सनफ्लॅग स्कूलच्या वादक चमुला राज्यस्तरावर सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. या चमुला मनोज दाढी, प्राचार्या अनुभा मंत्री, उपप्राचार्या वंदना आंबुलकर यांनी मार्गदर्शन केले. विजयी चमुला शाळेचे शिक्षक सुजित गजभिये, वंदना शर्मा, निकेश खेताडे यांचे सहकार्य लाभले.
या विजयी चमुमध्ये मधुलिका मोटघरे, विधी धनवलकर, विनी धनवलकर, तृप्ती रोडके, सोजल तितरगार, सलोनी दरवरे, विधी तिवारी, पूर्वा कारेमोरे, सिया पारधी, साक्षी पाटील, रिचा सिंग, कुंजल ठाकूर, हर्षल सारवे, अनुष्का वैद्य, अरूंधती शर्मा, चैताली साखरकर, राशी गायधने, वैष्णवी भुरे, यामिनी सार्वे, ईशिका काटेखाये, कृतीका पात्रे यांचा सहभाग होता. आता ही चमू राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी जाणार आहे. या स्पर्धेत औरंगाबाद, जळगाव, सातारा, बीड, अहमदनगर, चंद्रपूर, अकोला, परभणी, नांदेड, जालना, रत्नागिरी, ठाणे आदी १३ जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता.