ग्रा.पं. मध्ये आता सुपरफास्ट इंटरनेट; तुमच्या गावात आले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 02:20 PM2024-10-07T14:20:48+5:302024-10-07T14:21:10+5:30

डिजिटलायझेशनवर भर : केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी

Superfast internet now in Gram Panchayat; Did it come to your village? | ग्रा.पं. मध्ये आता सुपरफास्ट इंटरनेट; तुमच्या गावात आले का?

Superfast internet now in Gram Panchayat; Did it come to your village?

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने गत चार-पाच वर्षांपासून डिजिटल धोरण अवलंबिले जात असून, बहुतांश कामे ऑनलाईन करण्यात आली आहेत. दरम्यान, गावपातळीवरही ऑनलाईन कामे पार पडावी, यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून ग्रामपंचायतींना सुपर फास्ट इंटरनेट देण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे.


या योजनेच्या माध्यमातून प्रशासनाच्या पुढाकाराने बीएसएनएल व इतर कंत्राटदाराच्या सहाय्याने ग्रामपंचायतीमध्ये सुपर फास्ट इंटरनेट बसविण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील अनेक गावात सुपर फास्ट इंटरनेट सुविधा आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विकासकामांसोबतच आता नागरिकांचे कामे वेळेवर होणार आहेत. 


गावपातळीवर कार्यालयांना सुविधा

  • ग्रामपंचायत कार्यालयाचे ऑनलाईन कामकाज थांबू नये, कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ऑप्टीकल फायबरच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
  • ग्रामपंचायतींच्या गावात असणाऱ्या पाच कार्यालयांना ग्रामपंचायतच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा देण्याची गरज आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, पोलिस मदत केंद्र, तलाठी कार्यालय व वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश आहे


ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना इंटरनेट नाही
जिल्ह्यात ऑप्टीकल फायबर केबल टाकण्यात आले आहे. मात्र, सातही तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील काही भागात आजही इंटरनेटची सुविधा अद्याप उपलब्ध झाली नाही. सध्या सुपर फास्ट इंटरनेट सुविधा देण्यासाठी काम सुरू केले आहे. 


स्पीडने इंटरनेट मिळत नाही 
ग्रामपंचायत कार्यालयात फायबर केबलच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा कार्यान्वित होत नसल्यामुळे येथे स्पीडने इंटरनेट मिळत नाही. पर्यायाने विविध दाखले तसेच दस्ताऐवज अपलोड करणे शक्य होत नाही. गतीमुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
 

Web Title: Superfast internet now in Gram Panchayat; Did it come to your village?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.