लाखांदूर पोलीस उपनिरीक्षकांचा अधीक्षकांनी केला गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:33 AM2021-02-12T04:33:28+5:302021-02-12T04:33:28+5:30

लाखांदूर: गत सहा महिन्यांपासून लाखांदूर पोलीस विभागांतर्गत तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर घेतले जात ...

Superintendent of Lakhandur Police Sub-Inspector honored | लाखांदूर पोलीस उपनिरीक्षकांचा अधीक्षकांनी केला गौरव

लाखांदूर पोलीस उपनिरीक्षकांचा अधीक्षकांनी केला गौरव

googlenewsNext

लाखांदूर: गत सहा महिन्यांपासून लाखांदूर पोलीस विभागांतर्गत तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर घेतले जात आहे. समाजोपयोगी कार्याची दखल घेत भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी लाखांदूर येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांचा प्रशस्तिपत्र देऊन ९ फेब्रु. रोजी भंडारा येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात गौरव करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, अमोल कोकाटे व पोलीस अंमलदार मनिष चव्हाण यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी मोफत पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर घेतले जात आहे. या शिबिराला नियमित तालुक्यातील शेकडो युवकांची उपस्थिती लाभत असताना या शिबिरांतर्गत सराव परीक्षादेखील घेतल्या जात आहेत. शिबिराच्या आयोजनामुळे तालुक्यातील बेरोजगार युवकात अभ्यासाची आवड निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. पोलीस विभागांतर्गत गत सहा महिन्यांपासून अविरत सुरू असलेल्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांना प्रशस्तीपत्र व शुभेच्छा देत गौरव केला आहे.

Web Title: Superintendent of Lakhandur Police Sub-Inspector honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.