धान्य साठ्याअभावी ३८ राशन दुकानांचा पुरवठा रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 AM2020-12-31T04:33:35+5:302020-12-31T04:33:35+5:30
लाखांदूर: शासन प्रशासनासह अन्न पुरवठा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने पर्याप्त धान्य साठ्याअभावी महिना लोटत आला असतांना देखील तालुक्यातील ३८ राशन ...
लाखांदूर:
शासन प्रशासनासह अन्न पुरवठा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने पर्याप्त धान्य साठ्याअभावी महिना लोटत आला असतांना देखील तालुक्यातील ३८ राशन दुकानांचा धान्य पुरवठा रखदल्याची खळबळजनक माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यात अन्न पुरवठा विभागांतर्गत जवळपास ९६ स्वस्त धान्य दुकाने आहेत. सदर दुकानान्तर्गत दरमहा राशन कार्ड धारक कुटुंबांना शासकीय दराने एपिएल, बिपिएल, प्राधान्य गट व अंत्योदय योजनेंतर्गत दरमहा धान्य पुरवठा केला जातो. त्यानुसार तालुक्यातील सर्वच ९६ स्वस्त धान्य दुकानचालकांनी सद्याच्या डिसेंंबर महिन्यातील धान्याचा पुरवठा होण्यासाठी तालुका पुरवठा विभागाकडे आवश्यक कार्यवाही करुन धान्य उचल करण्याचे आदेश देखील प्राप्त केल्याची माहिती आहे. मात्र सदर कार्यवाही होतांना येथील शासकीय धान्य गोदामात आवश्यक धान्यसाठा उपलब्ध नसल्याने जवळपास ३८ राशन दुकानांचा धान्य पुरवठा रखदल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, यासबंधाने अधिक माहिती घेतली असता तालुक्यात सद्याच्या महिन्यात तांदूळ या धान्याचा पुरेसा पुरवठा न झाल्याने सदर समस्या निर्माण झाली असुन धान्यसाठा उपलब्ध होताच राशन दुकानांना पुरवठा नियमित केला जाणार असल्याक्षी माहिती देण्यात आली.
याप्रकरणी शासन प्रशासनासह अन्न पुरवठा विभागाने तात्काळ दखल घेवुन तालुक्यात रखडलेला धान्य पुरवठा नियमित होन्याहेतू आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी कार्डधारक कुटुंबांनी केली आहे.