शालेय सहलीसाठी मागेल तेवढ्या बसेसचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 06:00 AM2019-11-18T06:00:00+5:302019-11-18T06:00:41+5:30

मात्र शालेय सहलीसाठी खाजगी वाहनांचा वापर करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात वाढला आहे. मात्र खाजगी वाहनातून प्रवास करतांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ना शाळा घेते ना खाजगी वाहन चालक. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या पाल्यांना सहलीला जाण्यासाठी देखील नकार देतात. अनेकवेळा रस्त्यातच गाड्या बंद पडतात. त्यासाठी कोणतीच पर्यायी व्यवस्था नसते.

Supply of buses that ask for school trips | शालेय सहलीसाठी मागेल तेवढ्या बसेसचा पुरवठा

शालेय सहलीसाठी मागेल तेवढ्या बसेसचा पुरवठा

Next
ठळक मुद्देसुरक्षेची मिळणार हमी : विभागीय नियंत्रकांनी दिले आगार प्रमुखांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यातच नव्हे तर देशात सर्वात मोठे परिवहन म्हणून ओळखल्या जाणारा राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) ने यावर्षीच्या शालेय सहलीसह लग्नकार्य असो अथवा घरगुती समारंभासाठी चांगला निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक विनोद भालेराव यांनी प्रासंगीक करारावर शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी ‘बसगाड्या मागेल तितक्या पुरवठा करणार असल्याचे सांगितले.
तशा सुचना भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील आगार प्रमुखांना दिल्याचे सांगितले. यंदाच्या शैक्षणिक सहली अधिक सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे.
शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध घटकांची प्रात्याक्षिके, भौगोलिक, ऐतिहासीक घटनास्थळांना भेटी देण्यासाठी अनेक शाळांमधून शैक्षणिक सहलींचे आयोजन दरवर्षी केले जाते.
मात्र शालेय सहलीसाठी खाजगी वाहनांचा वापर करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात वाढला आहे. मात्र खाजगी वाहनातून प्रवास करतांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ना शाळा घेते ना खाजगी वाहन चालक. त्यामुळे अनेकदा पालक आपल्या पाल्यांना सहलीला जाण्यासाठी देखील नकार देतात. अनेकवेळा रस्त्यातच गाड्या बंद पडतात. त्यासाठी कोणतीच पर्यायी व्यवस्था नसते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एस.टी. विभागाने संपूर्ण राज्यभरात विशेष नियोजन केले असून एसटीच्या आयुक्तांनी याबाबतची माहिती राज्यातील सर्व आगाराना दिल्या आहेत.
भंडारातून परजिल्ह्यात विद्यार्थ्यांना घेवून जाता येते. सहलीसाठी एसटी बसेसचा प्रवासात असतांना काही तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी एसटीची व्यवस्था देखील जवळच्या आगारातून फोनद्वारे करुन दिली जाते किंवा त्याच जिल्ह्यात व्हॅन दुरुस्ती पथकाद्वारे तिथेच बसची तात्काळ दुरुस्ती केली जाते. हा फायदा होत असल्याने दुर्घटना घडल्यास एसटी महामंडळाच्या गाडीत प्रवास करतांना विमा संरक्षण प्रवाशांसाठी लागू आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान किमान दहा लाखापर्यंत विमा किंवा मदत मिळू शकते.

शालेय सहलींचा हंगाम सुरु झाला आहे. सहलीसाठी ज्या शाळांना बसेस नोंदणी करायच्या आहेत, त्यांनी आम्हाला लेखी पत्राद्वारे कळवावे. मागेल त्या शाळेला सहलीसाठी गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. सुरक्षीत प्रवासाच्या सहलींसाठी शाळांनी एसटी बसचा वापर करता येईल.
- विनोद भालेराव,
विभागीय नियंत्रक
एसटी महामंडळ, भंडारा

Web Title: Supply of buses that ask for school trips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.