साहायक अभियंत्याचे कंत्राटदाराला पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:44 PM2017-09-21T23:44:13+5:302017-09-21T23:44:32+5:30

तालुक्यातील रोहणा येथे जिल्हा परिषदच्या ५०/५४ योजने अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याची तक्रार करण्यात आली.

Support for Assistant Engineer's Contractor | साहायक अभियंत्याचे कंत्राटदाराला पाठबळ

साहायक अभियंत्याचे कंत्राटदाराला पाठबळ

Next
ठळक मुद्देचौकशीविनाच सिमेंट रस्त्याचे काम सुरू : कमिशन मिळाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : तालुक्यातील रोहणा येथे जिल्हा परिषदच्या ५०/५४ योजने अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याची तक्रार करण्यात आली. मात्र साहायक अभियंत्याने तक्रारदाराला पत्र देऊन साधी चौकशीही केली नाही. यावरून साहायक अभियंता कंत्राटदाराला पाठबळ देत असल्याचा आरोप तक्रारदार सुनील मेश्राम यांनी केला आहे.
बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून सिमेंट रस्त्याची चौकशी तक्रारदाराला घेऊन करावी व तसा अहवाल पाठवावा, असे पत्र ८ सप्टेंबरला कार्यकारी अभियंता यांनी सहायक अभियंता यांना दिले तरीही चौकशी होत नसल्याने तक्रारदाराने उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेतली.त्यावेळी त्यांनी साहायक अभियंता यांना फोन करून सिमेंट रस्त्याची चौकशी तक्रारदारांना घेऊन करण्याचे सांगितले. मात्र त्यांच्याही आदेशाला साहायक अभियंत्याने जुमानले नाही. पुन्हा १५ सप्टेंबरला तक्रारदार नवनियुक्त कार्यकारी अभियंत्यांना भेटले. त्यावेळी साहायक अभियंता यांना दूरध्वनीद्वारे तक्रारदाराला सोबत घेऊन निकृष्ट दर्जाचे होत असलेल्या सिमेंट रस्त्याची चौकशी करून सिमेंट रस्ता बघण्यासाठी मला बोलवा असे सांगितले त्यावेळी त्यांचे कक्षात उपकार्यकारी अभियंता हे सुद्धा उपस्थित होते.
यावरून सहायक अभियंता किती कार्यतत्पर आहे हे स्पष्ट होते. कार्यकारी अभियंत्याच्या पत्राला केराची टोपली दाखविली व दूरध्वनीवरच बोलण हवेतच विरले.कंत्राटाराला पाठबळ देऊन सिमेंट रस्त्याचे काम सुरूच ठेवून वरिष्ठ अधिकाºयांची व तक्रारदार यांची दीशाभूल सहायक अभियंत्यांनी या ठिकाणी केली आहे.
कंत्राटाराला पाच जणांना कमीशन द्यावे लागणार असल्याने व साहायक अभियंता, शाखा अभियंता यांचे निकृष्ट काम करण्यास पाठबळ मिळत असल्याने ठेकेदाराने सिमेंट रस्त्याच्या कामात मोठा गौडबंगाल करणे सुरू आहे. हे काम जिल्हा परिषदेच्या ५०/५४ योजने अंतर्गत मुख्य चौक ते सेलोकर यांच्या घरापर्यंत ३०० मीटर १५ लक्ष रूपये अंदाजपत्रकाचे असून काम करणारी यंत्रणा रोहणा ग्रामपंचायत आहे. चांगल्या योजनांना गालबोट लावण्याचे काम प्रशासनाचे अधिकारी व ठेकेदार करीत आहेत. चौकशी विनाच ठेकेदाराला कामाचे देयके दिल्यास उपोषण करण्याचा इशारा मेश्राम यांनी दिला आहे.

Web Title: Support for Assistant Engineer's Contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.