‘सूर राइझिंग स्टार्स चे’ आयोजन २५ रोजी

By admin | Published: January 23, 2017 12:28 AM2017-01-23T00:28:54+5:302017-01-23T00:28:54+5:30

मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देवून लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगाची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल.

'Sur Rising Stars' will be held on 25th | ‘सूर राइझिंग स्टार्स चे’ आयोजन २५ रोजी

‘सूर राइझिंग स्टार्स चे’ आयोजन २५ रोजी

Next

कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत स्पर्धात्मक कार्यक्रम : डाऊन लोड करा कलर्स टीव्ही अ‍ॅप, जज व्हा आणि दिसा टीव्हीवर लाईव्ह
नवोदित गायकांकरिता प्राथमिक फेरी आज
भंडारा : मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देवून लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगाची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनांचे रंग टिपून त्या भावनांचे एका वेगळ्या रंगात सिरीयल्सद्वारे सादरीकरण करून कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ज्याप्रमाणे लोकमत सखी मंचची गेल्या १६ वर्षांपासून घोडदौड सुरू आहे आणि सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकमत सखी मंचने प्रत्येकाच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
पुन्हा एकदा नवोदित आणि हौशी गायक कलाकारांसाठी राइझिंग स्टार ही मालिका कलर्स चॅनलवर ४ फेब्रुवारीपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे. याच निमित्ताने कलर्स व लोकमत सखी मंच आयोजित सूर राइझिंग स्टार्सचे हा गायन स्पर्धेचा कार्यक्रम २५ जानेवारी रोजी स्थानिक अखिल सभागृह, गणेशपूर येथे दुपारी ३.०० वा. आयोजित केला आहे. १८ वर्षांच्या वर कुणीही स्त्री किंवा पुरुष यात सहभागी होऊ शकतात. प्राथमिक फेरी २३ जानेवारी रोजी भंडारा पॅरामेडीकल कॉलेज राजीव गांधी चौक येथे दुपारी २ वाजता घेण्यात येईल. प्रथमिक फेरीतील निवडक १५ स्पर्धकांचा अंतिम फेरीत होणार कलाअव्षिकार म्हणजेच ‘सूर राइझिंग स्टार्स चे’ हा कार्यक्रम. या स्पर्धेच्या माध्यमातून राइझिंग स्टार्स जगाला दिसणार आहे.
कलर्स चॅनलवर येणाऱ्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम लाईव्ह दिसणार आहे. इतर शोसारखे जजेज समोर येवून कलाकारांना परफॉर्मन्स द्यायचा नसून कलाकारांचा लाईव्ह परफॉर्मंन्स बघून जनतेला वोटिंग करायचे आहे. वोट करणाऱ्या चेहरा स्क्रिनवर झळकणार आहे. अतिशय आगळा वेगळा अशा या कार्यक्रमाचे सेलिब्रेटी जजेस आहे. विख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकुर, अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ एकूण जनतेच्या आणि सेलिब्रेटी जजेसच्या निर्णयावर ठरणार राइझिंग स्टार - बघायला विसरू नका आणि सूर राइझिंग स्टार्सचे या कार्यक्रमात भाग घ्यायला विसरू नका. कलर्स आणि लोकमत सखी मंचचा हा कार्यक्रम निश्चितच तूम्हा आम्हा सर्वांच्याच पसंतीचा ठरणार यात शंका नाही.
अधिक माहीतीकरिता सीमा नंदनवार मो. ८०८७१६२३५२, ललित घाटबांधे मो. ९०९६०१७६७७ यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: 'Sur Rising Stars' will be held on 25th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.