आश्चर्य..! दोन तोंड असलेल्या वासराला गायीने दिला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:34 AM2021-04-11T04:34:53+5:302021-04-11T04:34:53+5:30
विशेष म्हणजे ते वासरू सुरक्षित असून हंबरडा फोडताना एकसुराने दोन्ही शिरांतून आवाज येतो. काहीतरी वेगळे घडते आणि तो लोकांसाठी ...
विशेष म्हणजे ते वासरू सुरक्षित असून हंबरडा फोडताना एकसुराने दोन्ही शिरांतून आवाज येतो. काहीतरी वेगळे घडते आणि तो लोकांसाठी आश्चर्याचा विषय ठरतो. दोन शिरांच्या वासराचा जन्म हा सध्या परिसरात कुतूहलाचा विषय आहे. गाईने जन्म दिलेले वासरू पाहून घरचेही आश्चर्यचकित झाले. शरीर सामान्य मात्र दोन शीर पाहताच घरच्यांनी आरडाओरड करीत शेजाऱ्यांना बोलावून घेतले. त्या असामान्य वासराला पाहण्याकरिता नागरिकांनी सुरेंद्रच्या घराच्या दिशेने धाव घेतली. गावभर ही चर्चा रंगली. नागरिकांच्या मते, तालुक्यात अशा प्रकारची घटना कधीच घडली नाही. सध्या हे वासरू संपूर्ण गावाच्या कुतूहलाचा विषय ठरले आहे. वैज्ञानिकदृष्ट्या 'जेनेटिक म्युटेशन' योग्य न झाल्याने अशा घटना घडतात. त्यात एकाच शीरांवर चार डोळे, वासराच्या कंबरेवर अतिरिक्त पाय या सारख्या अनेक घटना यापूर्वीही घडलेल्या असल्या तरी सदर एक धड आणी दोन शीर असलेली राज्यातील पहिलीच घटना असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे परिणामी ते बछडे तुमसर तालुका वासीयांचा कुतूहलाचा विषय ठरले आहे,