सोरणा, लोहारा येथे शेतपिकाची पाहणी

By Admin | Published: January 2, 2016 08:34 AM2016-01-02T08:34:08+5:302016-01-02T08:34:08+5:30

तुमसर तालुक्यात येत असलेल्या सोरणा व लोहारा परिसरात टमाटर, गोबी व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

Survey of Lohara, survey of farming | सोरणा, लोहारा येथे शेतपिकाची पाहणी

सोरणा, लोहारा येथे शेतपिकाची पाहणी

googlenewsNext

जांब (लोहारा) : तुमसर तालुक्यात येत असलेल्या सोरणा व लोहारा परिसरात टमाटर, गोबी व इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्याअनुषंगाने पदवीधर मतदार संघाचे आमदार अनिल सोले, आमदार चरण वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले यांनी या परिसरात लागवड केलेल्या टमाटर शेतपिकांची पाहणी केली.
यावेळी महेश उचिबगले, उपसरपंच गुलाब पिलारे, रोंधा येथील सरपंच विजय परतेती, उपसरपंच देवराम भोंडे, पंचायत समिती सदस्य गुरूदेव, सामाजिक कार्यकर्ता अनिल बांडेबुचे, तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर ढोरे, ग्रामपंचायत सदस्य बालचंद हिंगे, उचिबगले, राठोड, टमाटर लागवड केलेले या परिसरातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार चरण वाघमारे, आमदार सोले तथा जिल्हा परिषद सदस्य संदीप ताले यांनी शेतकऱ्यांची समस्या ऐकून घेतली. (वार्ताहर)

Web Title: Survey of Lohara, survey of farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.