विहिरीत पडलेल्या रानडुकरांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:25 AM2021-07-16T04:25:17+5:302021-07-16T04:25:17+5:30
इंदुरखा येथील रवींद्र कडव यांच्या शेतालगतच्या विहिरीत गुरुवारी तीन रानडुक्कर पडले. हा प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आला. त्यांनी वनविभागाला माहिती ...
इंदुरखा येथील रवींद्र कडव यांच्या शेतालगतच्या विहिरीत गुरुवारी तीन रानडुक्कर पडले. हा प्रकार शेतकऱ्याच्या लक्षात आला. त्यांनी वनविभागाला माहिती दिली. भंडाऱ्याचे वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राऊत यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक नीलेश श्रीरामे, वनपाल आर. एच. इरपाची, वनमजूर पातोडे घटनास्थळी पोहोचले. तसेच प्राणिमित्र नेहाल गणवीर, अनुराग गायधने हेही तेथे पाेहचले. विहिरीत पडलेल्या रानडुकरांना बाहेर काढण्याचे मोठे दिव्य या पथकापुढे होते. तब्बल सात तासाच्या प्रयत्नानंतर तिन्ही रानडुकरांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यापैकी एक रानडुक्कर मृत आढळून आले. दोन रानडुकरांना लगतच्या जंगलात सोडण्यात आले तर मृत रानडुकराचे शवविच्छेदन पशुधन अधिकाऱ्यांनी केले. त्यानंतर वनक्षेत्रात अंत्यसंस्कार करण्यात आले. विहिरीत नेमके रानडुक्कर कधी पडले, हे मात्र कळू शकले नाही. वन्यप्राणी शेतशिवारात शिरत असल्याचे यावरून दिसून येते.